Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादजालना :बातमीचा राग- राग करून पोलिसांत खोटी तक्रार करणाऱ्या प्रियंका राजपूतची हकालपट्टी...

जालना :बातमीचा राग- राग करून पोलिसांत खोटी तक्रार करणाऱ्या प्रियंका राजपूतची हकालपट्टी करा; पत्रकारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जालना :बातमीचा राग- राग करून पोलिसांत खोटी तक्रार करणाऱ्या प्रियंका राजपूतची हकालपट्टी करा; पत्रकारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा ईशारा
पत्रकारांचा जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक,महापालिका आयुक्तांना ईशारा
अँकर : जालना महानगर पालिकेमध्ये रुजु झाल्यापासून अनेक विषय आणि प्रकरणांमध्ये वादग्रस्त ठरलेल्या जालना शहर महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांच्या बाबत पत्रकार सय्यद अफसर यांनी बातमी प्रकाशित केली म्हणून पत्रकारांचा आवाज दाबण्यासाठी प्रियंका राजपूत यांनी त्यांच्या विरोधात कदीम जालना पोलिस ठाण्यात खोटी तक्रार दिलेली आहे.तसेच वादग्रस्त अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांच्यावर झालेल्या आरोपाची प्रतिक्रीया घेण्यासाठी पत्रकार सय्यद अफसर गेले असता त्यांना अपमानीत करुन धमकी दिली.त्यामुळे प्रियंका राजपूत यांची हकालपट्टी करा अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करू असा ईशारा आज पत्रकारांनी जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक, महापालिका आयुक्तांना निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.राजपूत यांनी पोलीस स्टेशनमध्ये खोटी तक्रार दिली असून ही तक्रार तत्काळ रद्द करण्यात यावी आणि वादग्रस्त प्रियंका राजपूत यांची जालना महानगर पालिकेतून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी, नसता पत्रकार संघटनाकडून राज्यभरात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल.असा ईशारा पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,विभागीय आयुक्त दिलीप गावडे,पोलीस अधीक्षक,जालना महापालिकेचे आयुक्त यांनाही निवेदनाच्या प्रति पाठवण्यात आल्या आहेत.
      दिलेल्या निवेदनावर विकासकुमार बागडी,सुयोग खर्डेकर,रविकांत दानम,शब्बीर पठाण, नाजिम मणियार, आमेर खान, शेख सलीम, सुनील भारती, सय्यद अफसर, देवचंद सावरे, सचिन सर्वे, शेख मुजीबुद्दीन, कादरी हुसेन, विजय साळी, अर्शद मिर्झा, आकाश माने, विकास काळे, श्रीकिशन झंवर, बाबासाहेब नरवडे, बासीत बेग, शेख इलियास अब्बास, भगवान निकम, गौतम वाघमारे, दिनेश नंद, शेख मुसा, सुनील खरात, लियाकत अली खान, शेख उमर, युवराज कुरील, गणेश जाधव, धनसिंह सुर्यवंशी,योगेश काकफळे, संजय आहेर इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments