भाजपा जालना महानगरात “मन की बात” कार्यक्रमाला कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग
पंतप्रधान मोदींजींच्या प्रेरणादायी विचारांनी कार्यकर्त्यांना नवचेतना – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे
जालना/प्रतिनिधी/ भारताचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी आज (ता.३१) सकाळी 11 वाजता “मन की बात” या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधला. हा मुख्य कार्यक्रम भाजप जिल्हा कार्यालय, जालना येथे संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे हे स्वतः उपस्थित होते. “पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे मार्गदर्शन हे प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रेरणादायी असून, ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशहिताचे विचार, सामाजिक जाणीवा आणि नवचेतना निर्माण होते.” असे त्यांनी सांगितले.
यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, सतीश जाधव, सोपन पेंढारकर, धनराज काबलिये, शशिकांत घुगे, तालुकाध्यक्ष संजय डोंगरे, भागवत बावणे, कपिल दहेकर, सिद्धिविनायक मुळे, विष्णू डोंगरे, देविदास देशमुख, अनिल सरकटे, कैलास उबाळे, सुभाष सले, मनोज बिडकर, जगदीश येनगुपटला, संतोष खंडेलवाल, विकास कदम, गौरव गोधेकर, निलेश गवळी, प्रशांत आढावे, शाम उगले, शाम उगले, राम शेजुळ, शिवाजी गायकवाड आदींसह अनेकांची उपस्थिती होती.
तसेच सदरील कार्यक्रम भाजपा जालना महानगरातील विविध मंडळात आयोजित करण्यात आला त्यामध्ये नवीन जालना मंडळात मंडळ अध्यक्ष सुनील खरे यांच्या मार्गदर्शनाखाली, जुना जालना मंडळात मंडळ अध्यक्ष महेश निकम, पूर्व जालना मंडळात अमोल धानुरे व जालना ग्रामीण मंडळात तालुकाध्यक्ष संजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाला महिला मोर्चा, युवा मोर्चा, व्यापारी आघाडी, अनुसूचित जाती-जमाती मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा, इत्यादी आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी “मन की बात” कार्यक्रम ऐकला.
