जालना गणेश फेस्टीवलमध्ये आज सभा मंडप पूजन
जालना : स्व. कल्याणराव घोगरे स्टेडियममध्ये आज म्हणजे गुरुवार, दि. 14 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता डॉक्टर, वकील, व्यापारी व प्रतिष्ठीत नागरीक या मान्यवरांच्या हस्ते सभा मंंडपाचे भूमीपूजन होणार ऊसन यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जालना गणेश फेस्टिवलचे अध्यक्ष अशोकराव आगलावे यांच्यासह जालना गणेश फेस्टिवलचे संस्थापक अध्यक्ष संजय लाखे पाटील यांनी केले आहे.
जालना गणेश फेस्टीवलचे हे 25 वे वर्षे म्हणजे रौप्यमहोत्सवी वर्षे असुन या निमित्त बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या पंचवीस वर्षात या फेस्टीवलचे नांव संपूर्ण महाराष्ट्रात झाले असून विविध आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलाकर देखील येथे येऊन गेले आहे. त्याच धर्तीवर यंदाही कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे.
यावेळी सर्वांसह गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जालना गणेश फेस्टिवलचे अध्यक्ष अशोकराव आगलावे यांच्यासह जालना गणेश फेस्टिवलचे संस्थापक अध्यक्ष संजय लाखे पाटील यांच्यासह संस्थापक सदस्यांनी केले आहे.
