जालना शहरातील मस्तगड परिसरातील युवकांचा
भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
जालना/प्रतिनिधी/ जालना शहरातील मस्तगड येथील युवकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपा नेते रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वावर आणि भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या संघटन कौशल्यावर विश्वास ठेवून त्यांनी प्रवेश केला.
या प्रवेशामध्ये पियुष मुंगसे, यश मस्के, हरिओम डोळझाके, साई कासार, मंथन यादव, कुशल श्रीगादी, राहुल कुमावत, नैतिक आंबिलवादे, शुभम रहाड, आज्ञान भगत, तनिष्क मस्के, आशिष हेलगट, वंश गाजरे, अमेय जोशी, ईश्वर तिडके, कृष्णा कुलथे, वैष्णव तायडे, वैभव कोल्हे आदी नवयुवकांचा समावेश आहे.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री. भास्कर आबा दानवे यांनी सर्व युवकांचे मनःपूर्वक स्वागत केले. त्यांनी सांगितले की “भाजप परिवारात दाखल झालेल्या या नव्या ऊर्जेमुळे पक्ष आणखी सक्षम व सबळ होईल. युवाशक्ती हीच खरी राष्ट्रशक्ती आहे. राष्ट्रनिर्मितीत युवकांची भूमिका महत्वाची असून भाजपच्या विचारधारेतून समाजहित साध्य करण्याची संधी नव्या पिढीला मिळणार आहे.” या प्रवेश सोहळ्याला तालुकाध्यक्ष श्री. संजय डोंगरे, श्री. शिवाजी दादा शेजुळ, तसेच भाजपा महानगर व जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
