शेतमजूर युनियन जालना,बदनापूर संयुक्त तालुका अधिवेशन संपन्न
जालना/प्रतिनिधी/ आज दिनांक 18 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा) चे जालना व बदनापूर तालुक्याचे संयुक्त अधिवेशन सिटू भवन,जालना घेण्यात आले. या अधिवेशनाला मार्गदर्शन करण्यासाठी राज्य अध्यक्ष कॉम्रेड मारुती खंदारे जिल्हाध्यक्ष कॉमेडी सरिता शर्मा, सिटू चे जिल्हासचिव कॉम्रेड ॲड.अनिल मिसाळ, जिल्ह्याचे प्रभारी सचिव भगवान कोळे यांची उपस्थिती होती, या अधिवेशनात शेतमजुरावर होणाऱ्या विविध अन्यायाच्या विरोधात संघर्ष करण्याचा निर्णय झाला मजुरांना सरकारने सन्मानाने वागवावे केरळच्या धर्तीवर किमान सात लाखाचे घर द्यावे शेतमजुरांच्या लेकरांना संपूर्ण शिक्षण मोफत द्यावे, रोजगार हमीवर किमान 700 रुपये रोज द्यावा, सरकारी दवाखान्यामध्ये औषध, डॉक्टर, व विविध साधनसामग्री निर्माण करून सरकारी दवाखाने मजबूत करावेत कारण सरकारी दवाखान्यामध्ये भरती होणारा हा शेतमजूर वर्ग असतो, महागाच्या काळात घर चालवणे खूप कठीण आहे हाताला काम नाही कामाचा योग्य दाम मिळत नाही शेतीवरील कामाचे दिवस प्रचंड कमी झालेले आहेत म्हणून शेतमजुरांना स्थलांतर केल्याशिवाय पर्याय नाही, म्हणून गावातच रोजगार हमीचे काम शेतमजुरांसाठी बारा महिने सरकारने सुरू करावे असे विविध ठराव ही अधिवेशनात घेण्यात आले. अधिवेशनाचे झेंडावंदन ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड मधुकर मोकळे यांनी केले, येणाऱ्या तीन वर्षाच्या काळासाठी तालुका कमिटी नेमण्यात आली या कमिटीचे अध्यक्ष गजानन तांगडे तालुका सचिव अनिल कांबळे, सदस्य म्हणून