जालना प्रशासनात चांगल्या अधिकाऱ्यांची गरज
जालना जिल्ह्यात भु-घोटाला व ईतर घोटाळे समोर येत आहेत. अनेक महसुल खात्यातील लोकांना निलंबीत करुन देखील लोकांचे काम होत नाहीत. खरेदीखत आधारे नामांतर होत नसल्याने मा. लोकआयुक्त यांनी जिल्हा प्रशासनावर प्रलोभनापोटी जाणुन-बुजुन नामांतर होत नसल्याबद्दल टिका केलेली आहे व राज्यापालाकडे सुद्धा या संदर्भात शिफारस करुन महसुल अधिकाऱ्यावर कारवाई करणे बाबत सांगीतले आहे. मंठा येथे खरेदीखत आधारे नामांतर होत नाही व जालना जिल्ह्यात सुद्धा या संदर्भात व विविध विभागासंदर्भात अनेक तक्रारी देऊन व जिल्हाधिकारी यांनी संबंधीत विभागाला पत्र देऊन देखील संबंधीत विभाग त्या पत्राला दुजोरा देत नाही व फक्त प्रशासकीय खर्च वाढतच आहे. अनुदान घोटाळा व बोगस पी. आर. संदर्भात अद्यापही कोणत्याही उच्च अधिकाऱ्याने स्वतः हुन जबाबदारी घेत राजीनामा दिलेला नाही. जालना येथुन प्रशासकीय निष्काळजीपणा तथा भ्रष्टाचारामुळे लोकांचे काम होत नसल्याने अदानी समुहाचा जो 2000 कोटीचा लॉजीस्टीक पार्क जालना येथे उभारला जाणार होता, तो सुद्धा रद्द झाल्याची बातमी वर्तमान पत्रात झळकली आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे व समस्याकडे जालना प्रशासन दुर्लक्ष करीत आहे तर दुसरीकडे भ्रष्टाचाराकडे लक्ष देऊन स्वतःची कमाई करत आहे. त्यामुळे प्रशासनात चांगल्या अधिकाऱ्यांची गरज भासत आहे. आता अधिवेशनात या मुद्यावर स्थानिक नेत्यांनी आवाज उठविणे गरजेचे असल्याचे मत अँड. महेश धन्नावत, कार्याध्यक्ष नोटरी असोसिएशन जालना यांनी व्यक्त केले.
-ॲड. महेश धन्नावत