जालना शहरातील फुकट नगर भागात सोरट आणि चक्रीगेम ऑनलाईन सट्ट्याचा सुळसुळाट, कारवाई करणार कोण.?
पैशाच्या आमिषाला बळी पडून अनेक कुटुंब होत आहेत ऊध्वस्त…
परिसरातील नागरीक या धंद्याला वैतागले,प्रशासनाचा कानाडोळा..
जालना /प्रतिनिधी / जालन्यात छत्रपती संभाजीनगर रोडवर फुकट नगर परिसरात सोरट आणि चक्रीगेम सट्ट्याचा सुळसुळाट मागील कित्येक दिवसांपासून सुरू आहे. हा ऑनलाईन सट्ट्याचा प्रकार असून या प्रकाराला शहरातील अनेक जण बळी पडत असून पैशाच्या आमिषापायी अनेक कुटुंब देशोधडीला लागले असल्याचे परिसरातील नागरीकांचे म्हणने आहे. खासकरून तरुण मुलं, विद्यार्थी, 15 ते 40 वय गटातील तरुण मुलं व नागरीक या ऑनलाईन सट्ट्याच्या नादाला लागून बरूबाद होत आहेत.
मागील काही दिवसांपुर्वी जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी विधानसभेत जालना शहरातील अवैध धंद्याविरोधात आवाज ऊठावला होता. त्यामुळे राज्यभरात जालना पोलिसांची नाचक्की झाली होती. पोलिसांनी त्यांनतर काही ठिकाणी कारवाईचा दिखाऊपणा केला. मात्र शहरात ऑनलाईन सट्टा अजूनही सुरूच असल्याचा प्रकार उघडकीस येत असून आता यावर कारवाई करणार कोण.? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे. शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवरील फुकटनगर भागात सहारा हॉटेलच्या बाजूला या ऑनलाईन सट्टयाचे दोन दुकानं असून गुलशन ए हिंद हॉटेलच्या बाजूला एक तर एमआरपी बिअरबारच्या बाजूला एक दुकान असून राजरोसपणे आॕनलाईन सट्टा लावल्या जात आहे.लहान मुलं या ऑनलाईन सट्टयाला चांगलेच आकर्षित झाले असून दहा रूपयाला शंभर रूपये असा या सट्ट्याचा भावअसल्याने लहान मुले सुध्दा आमिषाला बळी पडत आहेत.यामुळे तरुण मुलांचं भविष्य अडचणीत आलं आहे. पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल आणि अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी या प्रकाराला आळा घालावा आणि या दुकानांवर कारवाई करावी अशी मागणी आता परिसरातील नागरिकांच्या वतीने होत आहे.