जालन्यात तिरंगा सायकल रॅलीत
स्वच्छता आणि आरोग्याचा संदेश
जालना/प्रतिनिधी/ स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जालना सायकलिस्ट ग्रुप आणि फॅब रनर्स ग्रुप, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. 14 ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा सायकल रॅली काढण्यात आली.
सकाळी 7:30 वाजता मोतीबागेजवळील छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथून रॅलीला सुरुवात झाली. शनिदेव मंदिर, चमन, मस्तगड, सुभाषचंद्र बोस चौक, मामा चौक, सदर बाजार पोलीस स्टेशन, राजेंद्र प्रसाद रोड मार्गे ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे उत्साहात संपन्न झाली.
“एकत्र येऊ, स्वच्छता व आरोग्य राखू!” या घोषणेसह रॅलीत स्वच्छ जालना, सुंदर जालना, बेटी पढाओ, सायकल चालवा, आरोग्य बनवा, जल है तो कल है असे प्रभावी संदेश दिले गेले. पर्यावरणपूरक प्रवास व निरोगी भविष्यासाठी नागरिकांना प्रेरणा देणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
रॅलीत प्रशांत भाले, काशिनाथ मोरे, रितेश डागा, अनिल मालपाणी, अर्जुन जगताप, कैलास जाधव, भास्कर पवार, डॉ. सतीश शेकडे, दिनेश अण्णा, श्रीराम सर, अजय सिंगला, जवाहर काबरा, कैलास मस्के, प्रमोद पातुरकर, शिवाजी हिवराळे, मिलिंद वासनिक, केशरसिंग राजपूत, संदीप तापडिया, विष्णू पाटेकर, बलराज शिराळे, ईश्वर बिल्लोरे, धनसिंग सूर्यवंशी, गजानन राठोड, मनोज कुमकर, डॉ. दिलीप दिवटे यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. सायकल रॅलीच्या यशस्वीतेसाठी कैलास जाधव, प्रशांत भाले आणि काशिनाथ मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.