Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादजालना तालुक्यात अतिवृष्टीने मोठे नुकसान तात्काळ पंचनामे करावे - भास्कर आबा...

जालना तालुक्यात अतिवृष्टीने मोठे नुकसान तात्काळ पंचनामे करावे – भास्कर आबा दानवे

जालना तालुक्यात अतिवृष्टीने मोठे नुकसान

तात्काळ पंचनामे करावे – भास्कर आबा दानवे

जालना/प्रतिनिधी/  जालना तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संकटात आले आहेत. या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून रस्ते, पूल आणि शेतीसाठी महत्त्वाचे मार्ग वाहून गेले आहेत. तसेच काही भागात मुक्या जनावरांचीही जीवित हानी झाली आहे.

भाजपा जालना महानगराचे जिल्हाध्यक्ष भास्करराव पाटील दानवे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्राद्वारे तात्काळ मदत देण्याची मागणी केली आहे. पत्रामध्ये त्यांनी सांगितले आहे की, तालुक्यातील प्रत्येक मंडळातील अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या स्तरावर तात्काळ पंचनामे करावे. तसेच, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन स्तरावर योग्य ती मदत मिळावी व त्यांना दिलासा दिला जावा. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान जास्त वेळ न गवसता लवकरात लवकर भरून काढले पाहिजे. शासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित पंचनामे करावेत, या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे.

यावेळी तालुकाध्यक्ष संजय डोंगरे, जिल्हा सरचिटणीस सुनील पवार, विष्णू बापू डोंगरे, विजय मोहिते, गोवर्धन कोल्हे, नागेश अंभोरे, राजाराम जाधव, माऊली उगले, विलास मोहिते, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments