“जालना शहर महानगरपालिकेमार्फत शहरात एकल प्लास्टील वापर बंदी (Single Use Plastic) बाबत कारवाई”
जालना शहर महानगरपालिकेतील नवीन जालना व जुना जालना विभागातील सर्व स्वच्छता निरीक्षकांमार्फत शहरात एकल प्लास्टीक (Single Use Plastic) बाबत कारवाई करण्यात आली. यामध्ये शहरातील दुकानदार/आस्थापनामध्ये प्लास्टीक साठाबाबत माहिती मिळाल्यानुसार आज दिनांक ०३.११.२०२५ रोजी दुकानदार/आस्थापना सुमीत एजन्सी, फुले मार्केट, नवीन जालना यांच्याकडे प्लास्टीक आढळुन आल्याबाबत त्यांच्यावर ५,०००/- अक्षरी पाच हजार रुपये दंड व ०२ कुंटल ९४ किलो प्लास्टीक जप्त करण्यात आले. तसेच जुना जालना विभागामध्ये ०६ हजार दंड असे एकुण ११०००/- रुपये दंड वसुल करण्यात आला.
सदरच्या कार्यवाही ही मा. जिल्हाधिकारी तथा आयुक्त तथा प्रशासक जालना शहर महानगरपालिका यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त, सहायक आयुक्त सर्व स्वच्छता निरीक्षक व इतर कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली.
करिता जालना शहर महानगरपालिकेमार्फत शहरातील सर्व आस्थापना/दुकानदार व नागरिक यांना आवाहन करण्यात येते की, जालना शहर महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदुषण मंडळामार्फत याबाबत नियमितपणे तपासणी/पाहणी करण्यात आहे. प्लास्टीक वापरकर्त्यांवर दंडनीय कार्यवाही करुन गुन्हा नोंद करण्याबाबतची देखील कार्यवाही करण्यात येणार आहे. करिता एकल प्लास्टीकचा (Single Use Plastic) वापर, वाहतुक, विक्री व साठा करु नये याबाबत सहकार्य करावे तसेच शहरात ज्याठिकाणी प्लास्टीक वाहतुक, विक्री, वापर व साठा होत असेल तर याबाबत जालना मनपास अवगत करुन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
