Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादजालना शहरात श्रीराम मंदिरात महाआरती भव्यतेने संपन्न

जालना शहरात श्रीराम मंदिरात महाआरती भव्यतेने संपन्न

जालना शहरात श्रीराम मंदिरात महाआरती भव्यतेने संपन्न

श्री राममंदिराचा क्षण हा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल – भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

जालना/प्रतिनिधी/  आयोध्येतील श्रीराम मंदिरावर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केशरी धर्मध्वज फडकाविण्याचा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी जालना शहरातील राम मंदिर, बडी सडक येथे भव्य महाआरतीचे आयोजन आज २५ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाला रामभक्त, नागरिक, तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. संपूर्ण वातावरण जय श्रीराम च्या घोषणांनी दुमदुमले होते. यावेळी भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे म्हणाले की, “श्रीराम मंदिरावर केशरी धर्मध्वज फडकवला जाण्याचा दिवस हा हिंदू समाजाच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रामराज्याच्या मूल्यांना बळ मिळत आहे. जालना शहरातील रामभक्तांनी आज दाखवलेला भक्तीभाव आणि ऐक्य पाहून मन आनंदित झाले. आगामी काळातही धर्मकार्य, समाजकार्य आणि राष्ट्रकार्य यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे काम करत राहू तसेच देशाच्या सांस्कृतिक वारशाला जागतिक पातळीवर मान मिळवून देण्याचे कार्य मोदीजी पूर्ण निष्ठेने करत आहेत हे आजच्या दिवशी पुन्हा अधोरेखित झाले, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन सोमेश काबलिये यांनी केले असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे महाआरती यशस्वीपणे पार पडली.

यावेळी प्रदेश निमंत्रित सदस्य विमल आगलावे, जिल्हा उपाध्यक्ष सिद्धिविनायक मुळे, धनराज काबलिये, मंडळ अध्यक्ष सुनील खरे, जालना तालुकाध्यक्ष संजय डोंगरे, अर्जुन गेही, नगरसेवक जिवन सले, विजय पवार, सुनील राठीद, अजय भरतीया, संगीता पांजगे, देविदास देशमुख, कपिल दहेकर, जिल्हा सरचिटणीस सुनील पवार, ममता कोंड्याल, स्नेहा जोशी, वर्षा ठाकूर, राजू गवई, कृष्णा गायके, डोंगरसिंग साबळे, कल्याण भदनेकर, रोहित नलावडे, शिवाजी राठोड आदींसह मोठ्या संख्येने रामभक्त, नागरिक, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments