जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव
’मत्स्योदरी’ महाविद्यालयात आज उद्घाटन
अंबड/ डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव १५ व १६ सप्टेंबर रोजी अंबड येथील मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या वरिष्ठ महाविद्यालयात होणार आहे. महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती संचालक डॉ.कैलास अंभुरे व प्राचार्य डॉ.मिलिंद पंडित यांनी दिली.
यंदापासून जिल्हानिहाय युवक महोत्सव होणार आहे. मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या हस्ते सोमवारी सकाळी दहा वाजता उद्घाटन होणार आहे. संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री आ. राजेशभैय्या टोपे अध्यक्षस्थानी राहतील.
यावेळी विद्यापीठाचे माजी बीसीयुडी संचालक प्राचार्य डॉ .भागवतराव कटारे व प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. बी आर गायकवाड यांची सन्माननीय उपस्थित राहील. तर सिने गीतकार डॉ विनायक पवार व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ भारत खंदारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर मंगळवारी दुपारी चार वाजता समारोप व पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे. संस्थेचे सचिव मनिषाताई टोपे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. यावेळी अभिनेत्री वैशाली दाभाडे
कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, कारखान्याची उपाध्यक्ष उत्तम पवार, सह प्रशासकीय अधिकारी राहुल भालेकर , प्राचार्य डॉ राजेंद्र गायकवाड, संयोजक प्राचार्य डॉ.मिलिंद पंडित संचालक डॉ.कैलास अंभुरे यांच्यासह सल्लागार समितीचे सदस्यांची उपस्थिती राहणार आहे. जालना जिल्हयातील युवक महोत्सवात अंबड येथील मत्स्योदरी शिक्षण संस्थेत संपन्न होणार आहे. या महाविद्यालयात १५ व १६ सप्टेंबर रोजी या जिल्हयातील महाविद्यालयांचे संघ व सुमारे ४०० विद्यार्थी कलावंत सहभागी होणार आहेत. या महोत्सवाचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक डॉ.कैलास अंभुरे व प्राचार्य डॉ.मिलिंद पंडित यांनी केले आहे.