Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादजालन्याची पर्यावरणपूरक  शहराच्या दिशेने वाटचाल 

जालन्याची पर्यावरणपूरक  शहराच्या दिशेने वाटचाल 

जालन्याची पर्यावरणपूरक 
शहराच्या दिशेने वाटचाल 
रोटरीच्या शांती घनवनाचे सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते लोकार्पण-वर्षा पित्ती 
जालना/प्रतिनिधी/ रोटरी क्लब ऑफ जालना आणि महापालिका यांच्या संयुक्त प्रयत्नातून अनेक पर्यावरणपूरक उपक्रम राबविले जात असून, त्याअंतर्गत रोटरीतर्फे एसआरजे स्टील कंपनीच्या सीएसआर फंडातून देऊळगाव राजारोडवरील स्व. बाबुराव काळे चौक ते अग्निशमन दल या मार्गावर भारतीय प्रजातीच्या तीन हजार झाडांची लागवड करण्यात येऊन या ठिकाणी शांती घनवन विकसित करण्यात आले आहे. सोबतच या संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले असून, त्याचा लोकार्पण सोहळा सोमवार दि.  15 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते आणि रोटरी डिस्ट्रिक्टचे प्रांतपाल सुधीर लातूरे, महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर, एस आर जे वर्ल्ड ऑफ़ स्टीलचे संचालक सुरेन्द्र पित्ती यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आल्याची माहिती रोटरीच्या अध्यक्षा वर्षा पित्ती यांनी दिली.
      वर्षा पित्ती यांनी सांगितले की, रोटरीच्या ‘शांती सप्ताह’ निमित्त विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत राष्ट्रीय हिंदी विद्यालय क्रीडा संकुलाच्या समोर  ‘शांती घनवन’ विकसित करण्यात आले असून भारतीय प्रजातीची तीन हजार झाडे लावण्यात आली आहेत. संवर्धनासाठी संरक्षक जाळ्या, ठिबक सिंचनाची व्यवस्था, रंगरंगोटी, सिमेंट बेंच, सेल्फी पॉईंट आणि विजेची रोषणाई यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महापालिकेने या झाडांसाठी नियमित पाण्याची सोय केली आहे. सुमारे दोन हजार वर्ग फुट क्षेत्रावर विकसित व हरित विकासाला चालना देणारा ‘शांती घनवन’ हा प्रकल्प शहराच्या सौंदर्य वाढीस आणि पर्यावरण संवर्धनासाठी उपयुक्त ठरणार आहे. नागरिकांसाठी विरंगुळ्याचे तसेच हिरवळीने नटलेले  आकर्षक ठिकाण उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
     लोकार्पण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पर्यावरणपूरक उपक्रमाचे साक्षीदार बनावे, असे आवाहन रोटरी क्लबच्या अध्यक्षा वर्षा पित्ती, सचिव लक्ष्मीनिवास मल्लावत, प्रकल्प प्रमुख शिवरतन मुंदडा, सुरेश मगरे, हेमंत ठक्कर आणि सामाजिक कार्यकर्ते उदय शिंदे यांनी केले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments