जालना येथील आयटीआयमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु
जालना/ जालना येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत चालु वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून ऑनलाईन अर्ज दि.26 जुन 2025 पर्यंत संबंधितांना सादर करता येणार आहेत. अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांनी admission.dvet.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच जालना येथील जनार्दन मामा नागापुरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सोलार टेक्निशियन आणि ड्रोन टेक्निशियन हे दोन नवीन अभ्यासक्रम सुरु होण्याची शक्यता आहे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
