Tuesday, October 28, 2025
Homeऔरंगाबादजालना शहरातील वाहतुकीच्या मार्गाचे नियमनजालना शहरातील वाहतुकीच्या मार्गाचे नियमन

जालना शहरातील वाहतुकीच्या मार्गाचे नियमनजालना शहरातील वाहतुकीच्या मार्गाचे नियमन

जालना शहरातील वाहतुकीच्या मार्गाचे नियमन

 

जालना/ शहरातील रस्ता वाहतुकीमुळे सार्वजनिक जीवनास होणारा धोका, अडथळा व लोकांच्या गैरसोयी टाळण्यासाठी नागरिकांची सुरक्षा धोक्यात येत आहे. तरी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) (ख) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी शहरातील वाहतुकीच्या मार्गाचे नियमन केले आहे.

जालना शहरातील सराफा गल्ली, मामा चौक ते टांगा स्टँड आणि सिंधी बाजार ते अलंकार टॉकीज चौक येथे तीनचाकी आणि चारचाकी वाहनास सकाळी 9 ते रात्री 21 वाजेपर्यंत प्रतिबंध करण्यात आलेला आहे. तसेच शहरात काद्राबाद चौकी, सराफा बाजार, फुलबाजार चौकापर्यंत, महावीर चौक ते सुभाष चौक येथे सकाळी 9 ते रात्री 21 वाजेपर्यंत पी-1 व पी-2 पार्कींग व्यवस्था करण्यात येत आहे.

सर्व मार्गावरुन अग्निशामक दल, पोलिस दल, आणि सरकारी वाहन, स्कुल बस तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहनास प्रवेश राहील. पोलिस अधिकाऱ्यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम व सर्व प्रकारच्या मिरवणुकीच्या वाहनाला प्रवेश राहील. वाहनांच्या नियमन संबंधाने ज्या व्यक्तींना आक्षेप, सुचना  करावयाच्या असतील त्यांनी 15 दिवसांच्या आत लेखी स्वरुपात जिल्हाधिकारी कार्यालय, जालना यांच्या दाखल करता येतील. मुदतीनंतर प्राप्त होणारे आक्षेप व सुचना विचारात घेतले जाणार नाही. असेही जिल्हादंडाधिकारी जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments