जालना जिल्ह्यातील पिक विमा योजनेत स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा घटक समाविष्ट करा, शेतकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जालना /प्रतिनीधी/ दिनांक 26 सोमवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील पिक विमा योजनेत स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा घटक समाविष्ट करा अशी मागणी जालन्यातील शेतकऱ्यांनी केलीय. जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील राजेगाव येथील शेतकऱ्यांनी आज जालना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांच निवेदन सादर केलं. वर्ष – 2024 मध्ये जालना जिल्ह्यातील काही भागांत अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही शासनाकडून मदत मिळालेली नाहीये. त्यामुळे अतिवृष्टी मदतीपासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी. तसेच वर्ष – 2024 मधील फळपीक विमा शेतकऱ्यांना वाटप करावा यासह इतर विविध मागण्यांचे निवेदन यावेळी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय. दरम्यान, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात 30 मे रोजी जालन्यात शेतकऱ्यांची भव्य रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी गजानन उगले यांनी दिलीय.
यावेळी गजानन उगले,गजानन देवडकर,गणेश उगले, अरुण बुरकुल, नारायण खोजे,संभाजी ढेंबरे,शितल बारोटे,संतोष जाधव इत्यादी शेतकरी बांधवांची उपस्थित होते.