Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादजालन्यात सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांच्या पाठपुराव्याला यश

जालन्यात सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांच्या पाठपुराव्याला यश

जालन्यात सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांच्या पाठपुराव्याला यश
शहरातील सर्व स्वचछता निरीक्षकांना महानगरपालिकेनं काढल्या नोटीस..
दुसऱ्या बाहेरील व्यक्तीस कामावर असताना जीवीतास धोका निर्माण झाला किंवा शारिरिक ईजा झाली तर संपुर्ण जबाबदारी ही स्वच्छता निरिक्षकाची असणार..
 जालना /प्रतिनीधी /  जालन्यात सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांच्या पाठपुराव्याला मोठं यश मिळालंय. आज दि.14 बुधवार रोजी दुपारी साडेतीन वा. च्या सुमारास मिळालेल्या माहिती नुसार शहरातील सर्व स्वच्छता निरीक्षकांना महानगरपालिकेनं नोटीस बजावलीये. मागच्या काही वर्षात शहरात स्वच्छता होत नसल्याने सर्वत्र घाण पसरली आहे. त्यानंतर याचा साद बिन मुबारक यांनी आढावा घेतला असता. शहरात जवळपास पाचशे पेक्षा जास्त स्वच्छता कर्मचारी आहेत. मात्र यातले बरेच कर्मचारी हे आजारी असून घरी राहून पगार उचलतात. तर काही कर्मचारी हे त्यांच्या जागी इतर दुसर्या व्यक्तीला सफाई कामावर पाठवून पगार उचलतात. याबाबत साद बिन मुबारक यांनी महापालिकेला निवेदनं दिले होते. त्यानंतर महापालिका उपायुक्तांनी सर्व स्वच्छता निरीक्षकांना नोटीस बजवली आहे. त्यामुळं साद बिन मुबारक यांनी महानगरपालिकेचे आभार मानले. मात्र फक्त नोटीस काढून उपयोग नाही तर सर्व स्वच्छता कर्मचार्यांनी दररोज हजेरी घेतली पाहिजे. असंही साद बिन मुबारक यांनी म्हंटलं आहे.
जालना शहर महानगर पालिकेच्या उपायुक्तांनी काढलेल्या नोटिस मध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलले की,सफाई कामगार स्वतः कामावर येत नसून त्यांच्या जागी दुसऱ्यांना कामावर पाठवतात आणि स्वतः घरी बसून पगार घेतात असे निदर्शनास आले आहे. अशात दुसऱ्या बाहेरील व्यक्तीस कामावर असताना जीवीतास धोका निर्माण झाला किंवा शारिरिक ईजा झाली तर याची संपुर्ण जबाबदारी ही स्वच्छता निरिक्षकाची असून ही अत्यंत गंभीर बाब असून कार्यालयीन शिस्तीच्या विरुध्द आहे.यापुढे असा प्रकार निदर्शनास आल्यास विभाग प्रमुख आणि स्वच्छता निरिक्षक यांच्या विरोधात कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. अशी नोटीस ऊपायुक्त यांनी काढली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments