कलिकुंड पार्श्वनाथ सैतवाळ दिगंबर जैन मंदिर ची विश्वस्त मंडळ घोषित
अध्यक्ष पदी अमोल मोगले उपाध्यक्ष पदी वर्धमान वायकोस, सचिव पदी निलेश सावळकर याची निवड १००८ कलिकुंड पार्श्वनाथ सैतवाळ दिगंबर जैन मंदिर सिडको विश्वस्त मंडळ ची त्रैवार्षिक निवडणूक दिनांक १५/६/२०२५ रोजी अत्यंत पारदर्शक आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली या निवडणुकीत आर्य विद्या पवित्र पॅनल व श्री. कलिकुंड पॅनल व दोन स्वतंत्र उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यात आर्य विद्या पवित्र पॅनल चे अमोल मोगले, निलेश सावळकर, वर्धमान वायकोस, प्रकाश भाकरे, बाहुबली धोंगडे, शेखर वायकोस, दिपक डिकेकर, रविंद्र सांगोले, राजकुमार कुरकुटे हे सर्व ९ उमेदवार विजयी झाले. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून श्री गुलाबचंदजी बोराळकर तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ॲड.प्रेमचंदजी मडकर,ॲड. सिद्धेश घोडके, ॲड .देशभूषण मडकर , श्री संजय हनुमंते, सौ.किरण हनुमंते,
सौ. अर्चनाताई बोराळकर सौ. मंगल ताई लखपती यांनी अत्यंत पारदर्शक शिस्तबद्ध संपुर्ण निवडणूक प्रक्रिया राबवली. दिनांक २२/६/२०२५ रविवारी सकाळी ठिक ८-३० वाजता सर्व विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र आणी निवडणूकीची सर्व महत्वाची कागदपत्रे ही माजी अध्यक्ष दिगंबर क्षीरसागर यांनी स्विकारले. या प्रसंगी आर्य – विद्या-पवित्र पॅनल चे प्रमुख मार्गदर्शक विलास जोगी यांनी नुतन कार्यकारीणी घोषित केली अध्यक्ष पदी अमोल मोगले उपाध्यक्ष पदी वर्धमान वायकोस, सचिव पदी निलेश सावळकर, सह सचिवपदी रविंद्र सांगोले, कोषाध्यक्षपदी प्रकाश भाकरे, सह कोषाध्यक्षपदी शेखर वायकोस तर सदस्य पदी दिपक डिकेकर, बाहुबली धोंगडे, राजकुमार कुरकुटे यांच्या नावाची घोषणा केली तसेच आचार्य आर्यनंदि छात्रावास च्या अध्यक्षपदी वर्धमान वायकोस यांच्यावर जबाबदारी देण्यात आली
या प्रसंगी उपस्थितांना गुलाबचंद जी बोराळकर यांनी मार्गदर्शन करतांना आपली विश्वस्त म्हणून या ठिकाणी निवड ही समाजाने केली आहे त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणारं नाही, कषाय, अहंकार निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी व सर्व समाजाला सोबत घेऊन विकासाच्या कार्याला सुरुवात करावी. भव्यदिव्य मंदिर आहे या ठिकाणी स्वाध्याय सुरू करावा असे सुचवले या प्रसंगी माजी अध्यक्ष दिगंबर क्षीरसागर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. क्षीरसागर आबा यांनी शिस्तबद्ध आणि पारदर्शकपणे मंदिरचा सर्व कारभार ठेवावा असे सांगितले. जवळपास पस्तीस वर्षांपासून दिगंबर क्षीरसागर यांनी योगदान दिले आहे बोलतांना आबा भावनिक झाले होते.आर्य विद्या पवित्र पॅनल ला विजयी केल्या बद्दल सर्व श्रावक श्रावीका मतदार बंधु भगिनी चे विलास जोगी यांनी आभार व्यक्त केले व नुतन कार्यकारीणी निश्चित विकासात्मक कार्य करेल अशी ग्वाही दिली या कार्यक्रमात माजी अध्यक्ष दिगंबर क्षीरसागर यांचा सन्मान श्री वर्धमान वायकोस व निलेश सावळकर यांनी केला गुलाबचंद जी बोराळकर यांचा सन्मान श्री अमोल जी मोगले यांनी केला विलास जोगी यांचा सन्मान दिपक डिकेकर तथा रविंद्र सांगोले यांनी केला कार्यक्रमात प्रगती महिला मंडळाच्या वतीने नुतन कार्यकारीणी चा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला श्री राजकुमार वायकोस , श्री काळे काका , श्री विजयकुमार जी म्हेत्रे , श्री डी डी वायकोस यांच्या सह सौ. सविता ताई गोसावी, व प्रगती महिला मंडळातील सदस्या तसेच, सौ . मीनाक्षीताई उदगीरकर मंगलताई क्षीरसागर विनिता जोगी अर्चना मोगले लताताई महाजन वैशाली धोंगडे यांच्यासह समाजातील बंधु भगिनी ची लक्षणीय उपस्थिती होती.