जागतिक आरोग्य दिन : ७ एप्रिल
दरवर्षी ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन पाळला जातो. ७ एप्रिल १९४८ रोजी जागतिक आरोग्य संघटनाची स्थापना करण्यांत आली. ७ एप्रिल १९५० पासुन जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यांत येतो. दरवर्षी ॅभ्व् कडुन घोषवाक्य प्रसिध्द केले जाते. त्यानुसार संपुर्ण वर्षात ऑक्टीव्हीटी राबविण्यांत येते. या वर्षीचे घोषवाक्य खालील प्रमाणे आहे.
’आरोग्यपुर्ण सुरुवात, आशादायक भविष्य ’ असे आहे. आपल्या समाजाच्या आरोग्य सुरुवाती पासुनचं चांगले असेल तर आपले भविष्य हे निश्चितच चांगले असेल. याबाबत जनजागृती व्हावी म्हणुन हा एकमेव उद्देश.
दिवसेंदिवस मनुष्य धावपळीच्या जगात स्वतः आरोग्याकडे लक्ष न दिल्यामुळे प्रसंगी मृत्यू सुध्दा होतो. ही एक गंभीर समस्या बनु पाहत आहे. यावर मात करण्यांसाठी स्वतःच्या आरोग्याची सुरुवाती पासुन काळजी घेणे आवश्यक आहे. मधुमेह, हदयविकार, रक्तदाब, स्थुलता, कॅन्सर, किटकजन्यरोग, साथरोग इ. यातील काही आजार हे प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या तर या मात मिळु शकतो. उदा.हिवताप, डेंग्यु, चिकुनगुनिया, झिका, गॅस्ट्रो, कावीळ इ. कोरडा दिवस पाळणे, आय.ई.सी.चे पालन, आहार, नियमित व्यायाम, योग, ध्यानसाधना इ.गोष्टींचा अंगीकार करुन नियमित योग्य अंमलबजावणी केली तर निश्चितचं आरोग्य धन संपदा प्राप्त होईल. यानंतर सुध्दा काही लक्षणे दिसुन येताचं तात्काळ दाखवुन औषधोपचार घेणे ही आपली स्वतःची जबाबदारी आहे.
भविष्यातील आपले आरोग्य चांगले राहावे याकरिता पुढील बाबींची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. लवकर निदान, लवकर उपचार हिच आरोग्य जननी. वयाची चाळशी ओलांडल्यानंतर नियमित रक्ताची तपासणी मधुमेहसाठी, रक्तदाब तपासणी, इ.सी.जी., बी.एम.आय.,नेत्र तपासणी, इ.तपासण्या नियमित कराव्यात. आहार संतुलीत असावा. मीठाचा वापर कमी करणे, मसालेयुक्त आहार टाळणे. फास्टपुड टाळणे. धुम्रपान, तंबाखु, नशापाणीचे सेवन न करणे. परिसर स्वच्छेतेकडे लक्ष देणे. किटकजन्य आजार टाळण्यासाठी, कोरडा दिवस पाळणे, किटकनाशक भारीत मच्छरदाणीचा वापर करणे, गप्पी मासे पाळणे, पाण्याचे कंटेनर झाकुन ठेवणे.
उपरोक्त बाबींची आपण चांगल्याप्रकारे अंमलबजावणी केली तर आपले आरोग्य चांगले राहील यात शंका नाही. काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये रोग उद्भवल्यास शासनाच्या विविध योजना आहेत, त्याचा उपयोग करुन आपला अधिकार अबाधित ठेवावा. उदा.महात्मा फुले जन आरोग्य योजना, जे.एस.एस.के., प्रधान मंत्री मातृ वंदन योजना, कूटूंब कल्याण शस्त्रक्रिया असफल नुकसान भरपाई योजना, मानव विकास योजना, फिरते वैद्यकिय पथक इ.योजनांचा लाभ घ्यावा. कारण आपण त्यापासुन वंचित राहणार नाही व आपले जीवनमान सुकर होईल.
आरोग्य संस्थेत आपल्या अधिकाराबाबत काळजी घेतली जाते. उदा. आपल्या आजाराची गोपनीयता, कोणताही भेदभाव न करता सुरक्षित व गुणवत्ता पुर्ण आरोग्य सेवा देणे. आपल्या आजाराच्या औषधोपचाराबाबत माहिती देणे, आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी निर्णय घेण्यासाठी मदत करणे, आरोग्य हा मानवाचा अधिकार आहे. या वर्षी आपण निर्धार करु या की, आरोग्यपुर्ण सुरुवात, करुन आपले आरोग्याचे भविष्य निश्चित चांगले करुया.
आपणांस उत्तम आरोग्य लाभो हिच या दिनी सदिच्छा्..
( डॉ.जयश्री भुसारे )
जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हा परिषद, जालना.