जागतिक मधमाशी दिनानिमित्त ग्रामोदय मध प्रकल्प संचालक अविनाश गायकवाड यांची मुलाखत
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर /प्रतिनिधी/डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची ग्रामोदय प्रकल्पाला भेट परागीभवनासाठी आता शेतकऱ्यांना मधमाशा पेट्या मिळणार आता भाडेतत्त्वावर ग्रामोदयने साकारला अनोखा उपक्रम मधुमक्षिका पालन उद्योग प्रशिक्षण बद्दल कार्यशाळा सावखेडा येथील ग्रामोदय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण केंद्राला संभाजीनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे जैवविविधता विभागाचे विद्यार्थी या एकदिवसीय कार्यशालेत सहभागी झाले होते. त्यांनीआज नुकतीच भेट देऊन मधमाशी या छोट्याश्या किटकबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि ती सर्व माहिती जाणून घेत मीही धन्य झालो समोर विद्यार्थी पूर्ण माहिती मिळवत होते मि दैनिक आत्ताच एक्सप्रेस बातमी वार्तांकन करण्यासाठी तेथे गेलो होतो समोर या प्रकल्पाचे संचालक श्री बी एस,अविनाश गायकवाड हे मधमाशीच्या जीवन शैलीवर माहिती देत होते समोर विद्यापीठातील सर्व विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग अगदी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते, या किटकबद्दलची इतकी सखोल माहिती गायकवाड सर सांगत होते आणि ती वार्तांकन करतांना मि धन्य पावलो एवढी प्रचंड भर माझ्या ज्ञानात भर पडली मधमाशी पालन हा असा कीटक आहे की तो माणसालाही चांगलं जीवन जगण्याची कला शिकवतो त्या प्रशिक्षण केंद्राला आम्ही सर्व टीम गेल्याबरोबर सर्वप्रथम गायकवाड सरांनी मधुमक्षिका पालन बद्दलची आमच्या मनातील भीती घालवण्यासाठी मधमाशांच्या पेट्या विषयी माहिती सांगायला सुरुवात केली त्यानंतर हळूहळू मधमाशांच्या जाती आहेत त्याबद्दल माहिती सांगितली त्यात एक राणीमाशी असते बाकीच्या सर्व कामगिरी मधमाशा असतात राणी माझी ही त्यांच्या त्या बनवलेल्या पोळी मध्ये अंडी घालण्याचे काम करते काम करी माशा या परिसरातील तीन ते चार किलोमीटर परिघात जाऊन मकरंद आणि पराग जमा करून आपल्या घरट्यामध्ये भरतात आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी परागीभवनाचे कार्यकर्ता सर्वात महत्त्वाची माहिती आम्हाला त्या ठिकाणी मिळाली परागीभवन म्हणजे नेमकं काय असा माझा प्रश्न होता त्यांनी फार साध्या पद्धतीने उत्तर दिलं की निसर्गचक्र चालवण्यासाठी परागीभवनाची गरज असते आणि त्याशिवाय फलधारणा होत नाही म्हणून मधमाशी आहेे. दिवसभरात शेकडो फुलावर जाऊन या फुलातून त्या फुलात त्या फुलातून त्या फुलात जात असताना नर्मदी जे परागनाचे एकत्रीकरण होते आणि आपल्याला अन्नधान्य व फळधारणा मोठ्या प्रमाणावर होताना दिसते मधमाशांच्या एकूण किती जाती आहेत मधमाशांच्या असंख्य जाती आहेत त्यातल्या महत्त्वाच्या पाच आणि त्या म्हणजे सातेरी,फुलोरी ,काटेरी ,खोतया, आग्या, इत्यादी मग ह्या मधमाश्या पेटीत कसं काय बसू शकतात मी सांगितलेल्या मधमाशांच्या जाती पैकी दोन जाती ह्या अंधारात राहणाऱ्या जाती आहेत आणि त्या म्हणजे सातेरी होत्या आणखी एक नवीन जाती कसे झाले आहे ती म्हणजे इटलीयन या तीनही जाती अंधारात राहत असल्यामुळे पेटीत अंधार असतो आणि म्हणून ते आपलं कार्य आपली वस्ता स्थापन करून करतात मधमाशीच्या जन्माने मृत्यूची वयोमर्यादा किती मधमाशीच्या या वसाहतीमध्ये एकमेव दुवा म्हणजे त्यात एक राणीमाशी असते आणि राणी माशी चे कार्य केवळ मधमाशीची अंडी घालवण्यासाठी कार्यकर्ते अंडी घातल्यानंतर आळी अवस्थेमध्ये येण्यासाठी आणि मधमाशीचा जन्म होण्यासाठी एकूण १६ दिवसाचा कालावधी लागतो सोळाव्या दिवशी मधमाशी अवस्था निर्माण करून आपलं कार्य सुरू करते आणि सहा महिन्यापर्यंत तिच्या वयाची मर्यादा निसर्गाने दिले आहे राणी माशीची वयोमर्यादा ही तीन वर्षाचा कालावधी आहे मधमाशा चावल्याने काय फरक पडतो नागरिकांमध्ये उगाच मधमाशी बद्दल मोठी भीती आहे की मधमाशी चावते चावल्याने मृत्यू होतो यात काही तथ्य नाही मित्रहो मधमाशी तेव्हा चावते जेव्हा आपण तिला विशिष्ट पद्धतीने छेडछाड करतो अन्यथा हा फार शांत आणि गरीब कीटक आहे यात मधमाशा चावल्याने काही फरक पडत नाही हा थोडीशी सूज येते मात्र मधमाशी चावल्याचे अनेक फायदे आहेत डोळ्याचे मेंदूचे त्याचबरोबर संधिवात ऍलर्जीचे आजार असतील तर ते मधमाशी चावल्याने कमी होतात यातली आग्या माशी रागीट जात आहे ती समुद्रसपाटीपासून ५० ते 1१०० फूट अंतरावर उंच आपली वसतच आपण करते ती चावली तरीही फार काही फरक नाही मात्र मोठ्या प्रमाणावर आग्या माशांनी चावा घेतल्यास मृत्यू संभवतो या व्यवसायापासून शेतकऱ्याचे कोणकोणते फायदे आहेत मित्रहो या व्यवसायापासून शेतकऱ्यांना मद मिळेल पराग मिळेल सौंदर्यप्रसाधनासाठी प्रोपोलीस मिळेल मेणाचे उत्पादन घेता येईल सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोठ्या प्रमाणावर फळधारणा करण्याच्या दृष्टीने परागीभवन होईल त्यापासून सुमारे दीडपट उत्पन्न शेतकऱ्याचे वाढते ह्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत मधमाशीला चारापाणी करण्याची व्यवस्था कशी करतात तसे नाही मित्रहो मधमाशी ही फार स्वावलंबी कीटक आहे तो सकाळचे सूर्यकिरण मिळताच त्या दिशेने आपली कार्याची दिशा ठरवतो आणि निसर्गातील गवते जंगली वनस्पती या सर्व फुलांवरून आपल्या पायाच्या बकेटमध्ये पराक्रम जमा करतो आणि आपल्या पोटामध्ये मध साठवून आपल्या वसाहतीमध्ये घेऊन येतो तसेच निसर्गातील स्वच्छ खळखळणारे पाणी ठिबक सिंचन किंवा विहिरीतून पाझरणारे खडकातून पास जाणारे स्वच्छ पाणी हा कीटक जमा करून आपल्या वसाहत मध्ये भरतो एका पेटीतून किती मधाचे उत्पादन होते एका पेटीतून एका वर्षाला १० ते ३० किलो मधाचे उत्पादन मिळते आणि मधमाशी ने जमा केलेला मत हॅन्डमेड यंत्राद्वारे मधमाशीला धक्का न लागता आरामात काढून शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याचे उत्पादन घेता येते या व्यवसायाचे महत्त्वाचे धोके आणि तोटे काय या व्यवसायाला महत्त्वाचे धोके फक्त आजची शेती पद्धती अलीकडच्या काळात भरमसाठ रासायनिक शेती कडे शेतकऱ्यांचा कल आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रासायनिक फवारण्या होतात रासायनिक खते वापरले जातात त्यामुळे या कीटकांना धोके निर्माण झाले आहेत या मुख्य कारणामुळे मधमाशी कीटक निसर्गातून संपुष्टात येताना दिसतो मात्र शेतकरी बांधवांना याची कल्पना नाही या मधमाशीमुळे शेती उत्पादनाला किती लाभ होतो याबद्दल अज्ञान असल्यामुळे आम्ही जनजागृतीचे कार्य हातात घेतले आहे. आणि जिल्ह्यात आणि मराठवाड्यामध्ये ठिकठिकाणी कार्यशाळा प्रशिक्षण देण्यासाठी मी जात असतो शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने सुद्धा मला निमंत्रण असतात आता अलीकडच्या काळामध्ये शेतकऱ्यांमध्ये बदल जाणवत आहे. आता माझ्या शेकडो मधपेट्या शेतकरी हे भाडेतत्त्वावर घेऊन जातात आणि परागीभवन झाल्यानंतर मधमाशी पेटा परत आणून देतात एक मोठी जागृती अलीकडच्या काळात शेतकरी बांधवांमध्ये दिसत आहे आपण शेतकऱ्यांना काय संदेश द्याल यामध्ये मी एवढंच सांगेन की शेतकरी बांधवांनो मधमाशीच्या वसाहती जिथे कुठे आपल्याला निसर्गात आढळल्या तर त्यांची जाळपोळ दगड मारणे दूर करणे अशा हिसक पद्धतीने त्यांच्यावर अत्याचार करून मग घेऊ नका थोडसं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेत आपण मधाचे उत्पादन घेऊ शकतो परागीभवनाचे कार्य होईल जैविक शेतीकडे वाटचाल कराल सकस अन्नधान्य स्वतःला आणि देशालाही उपलब्ध करून देऊ शकाल आणि आपले आरोग्य परिणामी देशाचेही आरोग्य सुदृढ करण्यास वाव मिळेल ही सर्व माहिती त्या विद्यापीठांचे विद्यार्थ्यांबरोबर माहिती घेत असताना मधमाशीचे कीटकाबद्दल एवढं सखोल ज्ञान मला मिळाले गायकवाड सर माहिती देत होते आणि मी ऐकत होतो खरंच आपण किती अज्ञान होतो याची प्रचिती मला आली आणि म्हणून भरमसाठ उत्पादन घेण्यापेक्षा गुणवत्तापूर्वक उत्पादन किती महत्त्वाचे आहे हे मी पण एक शेतकरी म्हणून समजून घेण्यात धन्य झालो माझे सुद्धा आव्हान शेतकरी बांधवांना राहील की आपण निश्चित प्रशिक्षण घ्या आणि शाश्वत शेतीकडे वाटचाल करा त्यानंतर आम्ही सर्व विद्यार्थ्यांसोबत जायकवाडी धरणाच्या पायथ्याला वनभोजन घेतले त्याचे आनंद वेगळाच होता आणि समुद्र सईर करून भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाचा लाभ झाला या कार्यशाळेत श्री अविनाश गायकवाड यांनी बोलाची माहिती दिली या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जैवविविधता विभाग प्रमुख डॉक्टर शैलेश माखणीकर ,प्राध्यापक शाहजहान शेख ,मॅडम प्राध्यापक जैवविविधता समितीच्या गंगापूर तालुक्याच्या अध्यक्ष सौ ज्योतीताई गायकवाड ,प्रा स्वरा पैठणे मॅडम,श्री संकेत वैराळ, प्रमोद कुदळे, विजय राजपूत, नक्षत्र कैसल, प्रकाश गवई, मयुरी भगत ,वाल्मीक खेडकर, कृष्णा कांबळे, पुंडलिक पवार, धनराज चव्हाण, धर्मेंद्र टोमके, ग्रामोदय प्रकल्पाचे सेक्रेटरी संजय गायकवाड,चंद्रकांत केदारे,डॉ जान्हवी गायकवाड,सोनाली जगताप, ज्योती केदार आदी सावखेडा येथील केंद्र चालक साहेबराव केदारे, गणेश गुरुकुल, पोपट केदार आदींचा सहभाग होता शेवटी सर्व विद्यार्थ्यांनि आभार मानले.