“अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती निमित्त पाहेगावात विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद” – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांचे मार्गदर्शन”
जालना/प्रतिनिधी/ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आज पाहेगाव (ता. जालना) येथील जोगेश्वरी माता मंदिर परिसरात विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महाआरती, शंखनाद, भक्तिगीते, स्वच्छता अभियान तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्यांपैकी महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी आपल्या प्रभावी भाषणातून उपस्थितांना प्रेरणा दिली.
भाजपा जालना महानगरचे जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे म्हणाले की, “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या एक अष्टपैलू, दूरदृष्टी असलेल्या, लोकहितासाठी आयुष्य वेचणाऱ्या राजमाता होत्या. त्यांनी गड किल्ले, घाट, मंदिर, विहिरी, धर्मशाळा, शिक्षण संस्था यांची उभारणी करून समाजाचा विकास साधला. त्या काळात स्त्रियांना नेतृत्वाची संधी मिळणे कठीण होते, पण त्यांनी लोकाभिमुख राज्यकारभारातून एक आदर्श निर्माण केला. आज त्यांच्या विचारांचा वारसा आपण पुढे नेण्याची गरज आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत नव्या पिढीने शिक्षण, स्वच्छता, सामाजिक न्याय आणि महिलांचा सन्मान या बाबतीत पुढाकार घ्यावा. गावपातळीवर असे कार्यक्रम हे समाजमन जागृत करणारे असतात आणि तेच आपल्याला हवे आहे.” असे हि ते म्हणाले.
कार्यक्रम प्रसंगी कपिल दहेकर, तालुकाध्यक्ष संजय डोंगरे, श्री.सुनील पवार, वसंत शिंदे, बद्रिनाथ भसांडे, डॉ. तुकाराम कळकुंबे, परसराम तळेकर, गोवर्धन कोल्हे, मुकेश चव्हाण, रामजी शेजुळ, सतीश केरकळ, गजानन खरात, राजाराम जाधव, पांडुरंग आहेरकर, दौलत भुतेकर, नागेश अंभोरे, बाबासाहेब चाळगे, गोपाल चौधरी, दत्ता जाधव, अर्जुन मोहिते, लहू राठोड, राज जाधव, संदीप चव्हाण, कैलास मोहिते, रायमलजी (पुण्य नगरी), लासिराम राठोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन या कार्यक्रमाला यशस्वी केले. संपूर्ण परिसरात भक्तीमय आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते.
