हिंदु खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळाच्या
कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर – हिंदु खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मर्यादित (महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची उपकंपनी, मुंबई ) जिल्हा कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरीता अनुदान योजने अंतर्गत ९ कर्जप्रकरणाचे उद्दिष्ट, बीज भांड्वल योजनेअंतर्गत ९ कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट, थेट कर्ज योजने ( थेट कर्ज योजना रु.१ लक्ष पर्यंत ) अंतर्गत४4 कर्जप्रकरणाचे उद्दिष्ट व एनएसएफडीसी योजने अंतर्गत १४ कर्जप्रकरणांचे उद्दिष्ट आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीतील हिंदु खाटीक समाजातील गरजूंनी आपला अर्ज आवश्यक कागदपत्रासह नोव्हेंबर २०२५ अखेरपर्यंत जिल्हा कार्यालय छत्रपती संभाजीनगर डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन खोकडपुरा छत्रपती संभाजीनगर येथे करावा.उद्दिष्टापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास अर्जाची संगणकीय रेंडमायझेशन प्रणालीद्वारे अनुदान योजना, बीजभांडवल योजना, थेट कर्ज योजना व एनएसएफडीसी योजने अंतर्गत निवड करण्यात येणार आहे. उर्वरित निवड न झालेले अर्ज रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक हिंदु खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ यांनी केले आहे.
