जिल्हास्तरीय हिंदी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान पिशोर येथील जयवंतराव पाटील यांना
कन्नड /प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील पिशोर येथील घाटमाथा शिक्षण प्रसारक मंडळ, शफेपुर संचलित, महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील हिंदी विषयाचे प्रा. जयवंतराव श्रीराम पाटील यांना हिंदी प्रचार व प्रसार कार्या करीता महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघ, पुणे यांच्या वतीने छत्रपति संभाजी नगर जिल्हा स्तरीय “हिंदी आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५
प्रदान करण्यात आला.
उपर्युक्त पुरस्कार सोहळा त्रिमूर्ति पावन प्रतिष्ठान, त्रिमूर्ति नगर, नेवासा फाटा ता. नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथे नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार मा. सत्यजीतजी तांबे व त्रिमूर्ति प्रतिष्ठानचे संस्थापक मा. श्री साहेबरावजी घाड़गे पाटील यांच्या हस्ते दोन दिवसीय हिंदी कार्यशाळा अंतर्गत कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाचे अध्यक्ष आदरणीय प्रा. डॉ. मिलिंदजी कांबळे सर, सचिव प्रा. डॉ. रेवनाथजी कर्डिले, कोषाध्यक्ष प्रा. सुंदर लोढ़े तसेच छत्रपति संभाजी नगर विभागचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजकुमार कांबले, सचिव प्रा. डॉ. अरुण आहेर जिल्हाध्यक्ष प्रा. गोरख सूर्यवंशी आदि मान्यवर उपस्थित होते. या हिंदी कार्यशाळे साठी राज्याच्या सर्व विभागातून जवळपास दिडशे हिंदी विषयाचे प्राध्यापक आलेले होते.
प्रा. जयवंतराव पाटील यांना पुरस्कार मिळाल्या बद्दल घाटमाथा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष क. रा. नवले गुरूजी, सचिव गोकुळ दादा मोकासे, काकासाहेब मोकासे, बाळासाहेब मोकासे, भुषण नवले सुनील मोकासे, प्राचार्य एन. आर. नवले, उपप्राचार्य श्रीमती अर्चना नवले, पर्यवेक्षक के. एम. हळदे , कॉलेज विभाग प्रमुख प्रा. विजय वाघ, प्रा. डॉ. संजय गायकवाड, प्रा. राजेश भावसार प्रशांत कोतकर, संतोष जाधव विजय सोनवने सत्येंद्र सपकाळे डॉ. गीताराम पवार शहादेव गावडे, प्रा. अमोल निकम व माध्यमिक विद्यालयाचे संपूर्ण शिक्षक वृंद तसेच लक्ष्मण मोकासे, समाधान मोकासे, यासीन शाह आदि शिक्षकेतर कर्मचारीवर्गाने प्रा.जयवंतराव पाटील यांचे कौतुक व अभिनंदन केले.