सायली किरगत हिची राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धासाठी निवड
खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील गुजरात राज्यातील भुज येथे होनाऱ्या राष्ट्रीय वरिष्ठ महिला हँडबॉल स्पर्धासाठी सायली वैभव किरगत हिची महाराष्ट्रच्या संघात निवड झाली आहे सायली किरगत ही एमएसएम कॉलेज ऑफ फिजिकल एजुकेशनची विद्यार्थिनी व गायकवाड़ ग्लोबल स्कुलची क्रीड़ा शिक्षीका म्हणून कार्यरत आहे हँडबॉल फेडरेशन ऑफ़ इंडिया यांच्या अंतर्गत भुज ( गुजरात ) येथे दी 28 जून ते 3 जुलै दरम्यान राष्ट्रीय वरिष्ठ महिला हँडबॉल स्पर्धा पार पडणार असून या स्पर्धा साठी हँडबॉल असोसीएशन महाराष्ट्र यांनी महाराष्ट्र संघाची निवड चाचणी रविवार दी 22 जून रोजी खारघर मुंबई येथे आयोजित केली होती या निवड चाचणीत सायली किरगत हिने दमदार खेळी करीत महाराष्ट्र संघात आपले स्थान कायम केले तिच्या या निवड़ी बद्धल द हौशी हँडबॉल असोसीएशन छत्रपती संभाजीनगरचे
अध्यक्ष श्रीकांत जोशी , सचिव प्रभाकर भारसाखळे , कोषाध्यक्ष डॉ सत्यजीत पगारे , पंकज भारसाखळे , डॉ सचिन पगारे , संजय सातदिवे , जिल्हा क्रीड़ा अधिकारी बाजीराव देसाई , माजी क्रीड़ा अधिकारी गोकुळ तांदळे , एमएसएम प्राचार्य डॉ मकरंद जोशी , मैदान प्रमुख डॉ रफीक सिद्धिकी , डॉ कालिदास तादलापूरकर , आतंरकुल सामने प्रमुख डॉ माणिक राठोड , गायकवाड ग्लोबल स्कूलचे अध्यक्ष प्रो.रामदास गायकवाड , संस्थापक अध्यक्ष सौ कालिंदा गायकवाड , श्री. कुलभूषण गायकवाड , श्री नंदकुमार दनदाले , प्राचार्य डॉ. सुलेखा ढगे , यशवंत मोकाशी , गणेश बेटूदे , आशीष कान्हेंड , मो अख्तर कुरैशी यांनी अभिनंदन केले
