हैदराबाद – हिसार – हैदराबाद एक्स्प्रेस आणि काकीनाडा पोर्ट – साईनगर शिर्डी – काकीनाडा पोर्ट च्या कोच संरचनेत बदल
दक्षिण मध्य रेल्वे ने गाडी क्रमांक 17020 / 17019 हैदराबाद – हिसार – हैदराबाद एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक 17206/17205 काकीनाडा पोर्ट – साईनगर शिर्डी – काकीनाडा पोर्ट च्या कोच संरचनेत बदल करण्याचे ठरविले आहे.
- गाडी क्रमांक 17020 / 17019 हैदराबाद – हिसार – हैदराबाद एक्स्प्रेस या बदलानंतर या गाडीमध्ये 01 प्रथम श्रेणी वातानुकुलीत (1AC), 03 द्वितीय श्रेणी वातानुकुलीत (2AC), 04 तृतीय श्रेणी वातानुकुलीत (3AC), 01 पेंट्री कार, 07 द्वितीय श्रेणी शय्या (SLEEPER CLASS), 04 जनरल क्लास (GS), 01 पावर कार आणि 01 एस एल आर असे एकूण 22 डबे असतील.
हा बदल हैदराबाद येथून सुटणाऱ्या गाडीत दिनांक 04 ऑक्टोबर 2025 पासून आणि हिसार येथून सुटणाऱ्या गाडीत दिनांक 07 ऑक्टोबर 2025 पासून लागू करण्यात येईल.
- गाडी क्रमांक 17206/17205 काकीनाडा पोर्ट – साईनगर शिर्डी – काकीनाडा पोर्ट एक्स्प्रेस या बदलानंतर या गाडीमध्ये 01 प्रथम श्रेणी वातानुकुलीत (1AC), 02 द्वितीय श्रेणी वातानुकुलीत (2AC), 04 तृतीय श्रेणी वातानुकुलीत (3AC), 02 तृतीय श्रेणी इकोनॉमी वातानुकुलीत (3ACE), 05 द्वितीय श्रेणी शय्या (SLEEPER CLASS), 04 जनरल क्लास (GS), 01 पावर कार आणि 01 एस एल आर असे एकूण 20 डबे असतील.
हा बदल काकीनाडा पोर्ट येथून सुटणाऱ्या गाडीत दिनांक 13 ऑक्टोबर 2025 पासून आणि साईनगर शिर्डी येथून सुटणाऱ्या गाडीत दिनांक 14 ऑक्टोबर 2025 पासून लागू करण्यात येईल.
