हतनुर येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी 29 वर्षानंतर स्नेहसंमेलन
कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील हतनूर येथील जिल्हा परिषद प्रशालेतील १९९५-१९९६ च्या दहावीच्या बॅचचे विद्यार्थी तब्बल २९ वर्षांनंतर १६ नोव्हेंबर रोजी एकत्र आले. दीर्घकाळानंतर झालेल्या भेटीत अनेकांच्या डोळ्यांत पाणी तरळले.
“हीच ती शाळा जिथे आपण अक्षर ओळखले, शिस्त शिकलो आणि जीवनातील संघर्षांना सामोरे जाण्याची प्रेरणा मिळाली. या शाळेनेच आपल्याला जगण्याचे आणि जगवण्याचे बळ दिले. ज्या शाळेने ‘ज्ञानाचे कर्ज’ दिले, ते काही प्रमाणात फेडण्याचा प्रयत्न
करूया,” अशा भावना या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
स्नेहमेळाव्यास निवृत्त
स्नेहमेळाव्यात आठवणींना दिला उजाळा
शिक्षक भागीनाथ भवर, अंबादास साळुंके, वसंतराव अकोलकर, काशीनाथ राऊत, तोताराम दांडगे, शेषराव देशमुख, साहेबराव पवार उपस्थित होते. त्यांचा विद्यार्थ्यांनी फोटो फ्रेम देऊन सन्मान केला. विशेष
म्हणजे या विद्यार्थ्यांना त्यांच्या जुन्या वर्गात बसवून प्रतीकात्मक ३० मिनिटांचा तास घेण्यात आला. या सत्रात सर्वांनी शालेय जीवनातील गोड आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाला एकूण ९२ विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत आपल्या आयुष्यातील सध्याच्या घडामोडींबद्दल माहिती दिली.