हातमाग दिनानिमित्ति विणकरांना स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर – शासनाच्या वस्त्रोद्योग विभगामार्फत पारंपारीक हातमाग विणकरांना बक्षीस योजना जाहिर करण्यात आलेली आहे. विजेत्या स्पर्धकाचे राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त गौरव करण्याचे वस्त्रोद्योग विभागामार्फत निर्देश देण्यात आले आहे. पारंपारीक कापडाचे उत्तम नमुने तांत्रिक तपशील व विणकाम करतानाचा जिओ टॅगीग फोटो, महाराष्ट्राचा रहिवासी असल्याबाबत पुरावासह विणकरांनी प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग, छत्रपती संभाजीनगर, बाळासाहेब पवार सहकार भवन, तिसरा मजला, जाफरगेट, छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवार दि.25 जुलै पर्यंत जमा करावेत. विभागातील अधिकाधिक हातमाग विणकरांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे,असे आवाहन प्रादेशीक उपायुक्त वस्त्रोद्योग प्रशांत सदाफुले यांनी केले आहे.
