हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन आणि जारा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन!
भारत देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त 51 रक्तदात्यांनी केले रक्तदान!
छत्रपती संभाजीनगर: भारत देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त 10 ऑगस्ट 2025 रविवारी रोजी हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन आणि जारा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे रक्तदान शिबीर न्यू बायजीपुरा कॉर्नर, सेंट्रल नाका रोड, अलहुदा मुलीची माध्यमिक शाळेच्या बिल्डिंगमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू होते. भारत देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशासाठी समर्पित हा भव्य रक्तदान शिबीर ठेवण्यात आले होते. शिबिरात 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले. हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनतर्फे या सर्व रक्तदात्यांचे आभार मानत सर्वांना पेन गिफ्ट करण्यात आलें. रक्त संकलनाचे कार्य संजीवनी रक्त केंद्राच्या सर्व टिमने केले. संजीवनी रक्त केंद्राच्या सर्व टीमला ही हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनतर्फे पेन गिफ्ट करण्यात आले. हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन तर्फे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर व इतर सहकाऱ्यांनी आणि जारा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जावीद मुकीम पटेल व त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.