हनुमान जन्मोत्सवाची खुलताबादेत जय्यत तयारी, काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता
खुलताबाद प्रतिनिधी खुलताबाद येथील ग्राम दैवत लाखो भाविकांचे श्रध्दा स्थान असलेल्या भद्रा मारोती मंदिरात शनिवारी (दि.१२) साजरा होणार या हनुमान जन्मोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी झाली असून,या नंतर सराला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार असल्याची माहिती भद्रा मारोती संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठु पाटील बारगळ.यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे दिली.
खुलताबाद येथील भद्रा मारोती जन्मोत्सव सोहळ्याला दरवर्षी मोठी गर्दी होते,यंदाही भाविकांचे दर्शन व्यवस्थित व्हावे म्हणुन संस्थान वतीने विशेष दर्शन व्यवस्था केली असून,महिलांसाठी मोफत दर्शन व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
भद्रा मारोती मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळ्या निमित्त १५० बाय २०० चा भव्य मंडप टाकण्यात आला असून, ३० सी.सी.टी. व्ही. कॅमेरे, १५० पोलीस कर्मचारी, ५० सुरक्षा कर्मचारी, १०० ते १५० एस टी महामंडळाचे बसेसची व्यवस्था करण्यात आली असून, भाविकांना पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, अग्निशमन दल आदी सुविधा ठेवण्यात आल्या आहेत.
हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मंदिर, मुख्य प्रवेशद्वारावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून, यंदाचा हनुमान जन्मोत्सव सोहळा संस्थानचे सचिव राज्याचे मंत्री अतुल सावे, उपाध्यक्ष रामनाथ बारगळ, सहसचिव खंडेराव बारगळ, विश्वस्त-चंद्रकांत खैरे, कचरू बारगळ, कुलभूषण अग्रवाल, कार्याध्यक्ष किशोर अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा होत आहे.
