हंस फाउंडेशनतर्फे गरजू विद्यार्थिनींना स्वेटर वाटप
जालना/प्रतिनिधी/ थंडीच्या दिवसांत विद्यार्थिनींच्या आरोग्याची व शिक्षणाची काळजी घेण्याच्या उद्देशाने हंस फाउंडेशन तर्फे मत्स्योदरी विद्यालय,घुंगर्डे हादगाव येथे शाळेतील गरजू विद्यार्थिनींना स्वेटरचे वाटप करण्यात आले.आर्थिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थिनींना उबदार कपड्यांचा अभाव भासतो. अशा परिस्थितीत शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये तसेच विद्यार्थिनींचा आत्मविश्वास वाढावा, या सामाजिक जाणिवेतून हा उपक्रम राबविण्यात आला.स्वेटर मिळाल्यानंतर विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान स्पष्टपणे दिसून आले.या कार्यक्रमास हंस फाउंडेशनचे प्रतिनिधी माऊली दोबोले,योगेश हेंद्रे,शाळेचे मुख्याध्यापक कल्याण सोळुंके,भानुदास दोबोले व शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी हंस फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत भविष्यातही असे उपक्रम राबविण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या हंस फाउंडेशन व सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.