हजरत ख्वाजा शेख मुन्तजीबोद्दीन जरजरी जरबक्ष रह. यांच्या उरुसासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – तहसीलदार स्वरूप कंकाळ
खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद येथील हजरत ख्वाजा शेख मुन्तजीबोद्दीन जर जरी जर बक्ष दूल्हा रह. यांच्या उरुसाला सातशेहून अधिक वर्षांची परंपरा असून, यंदा हा ७४० वा उरुस मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. उरुसाचे आयोजन सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी उरुस व्यवस्थापन समितीच्या आढावा बैठकीत केले.
सोमवारी (दि.११) नगरपरिषद सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला नगरपरिषदाचे मुख्याधिकारी तथा उर्सव्यवस्था समितीचे सचिव शेख समीर, खुलताबाद पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती पुराणिक,दर्गा कमिटीचे अध्यक्ष एजाज अहमद, उर्स व्यवस्था समितीचे सदस्य तथा दर्गा कमिटीचे उपाध्यक्ष इम्रान जहागीरदार, सदस्य युसुफोद्दीन चिरागोद्दीन (उर्फ राजू), मुबशीरउद्दीन अमीरोद्दीन. तसेच या
बैठकीत महावितरण, सा. बां. उपविभाग, आरोग्य, पाणीपुरवठा विभाग व पोलीस प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. महावितरणला मागील वर्षी घडलेल्या अडचणी टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सागर सावजी, महावितरणाचे सहाय्यक अभियंता सिद्धेश्वर गव्हाड, लाईनमन अन्सार शेख व संतोष बनकर, नगरपरिषदेचे जितेंद्र बोचरे, स्वच्छता विभागाचे अंकुश भराड यांच्यासह,यांचे सह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
