Tuesday, October 28, 2025
Homeऔरंगाबादराज्यातील हजारो शिक्षकांना प्रतीक्षा प्रमाणपत्राची; वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र त्वरित उपलब्ध...

राज्यातील हजारो शिक्षकांना प्रतीक्षा प्रमाणपत्राची; वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र त्वरित उपलब्ध करून देण्याची हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनची मागणी!

राज्यातील हजारो शिक्षकांना प्रतीक्षा प्रमाणपत्राची; वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र त्वरित उपलब्ध करून देण्याची हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनची मागणी!

प्रशिक्षण होऊन दोन महिने उलटले तरी प्रमाणपत्राचा पत्ताच नाही!
छत्रपती संभाजीनगर: राज्यात २ जून २०२५ ते १२ जून २०२५ या कालावधीत शिक्षकांचे वरिष्ठ-निवड श्रेणी प्रशिक्षण घेण्यात आले. शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी देण्यासाठी आधी ऑनलाइन टेस्ट, प्रत्येक तासिकेला उपस्थिती, प्रशिक्षणार्थीची उपस्थित असूनही नावे उपस्थिती पत्रकावर न येणे, तसेच सव्र्व्हर डाऊन या समस्यांमुळे हे प्रशिक्षण यंदा खूप गाजले होते. शाळा सुरू होण्यापूर्वी हे प्रशिक्षण राजभरातील सर्व शिक्षकांना देण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण करून शिक्षकांनी शासनाच्या निर्देशानुसार संशोधन अहवाल व स्वाध्याय वही वेळेत सादर केली आहे. सर्व आवश्यक टप्पे पूर्ण करून प्रकल्प जमा करूनदेखील आता जवळपास दोन महिने उलटून गेले आहे. तरीदेखील संबंधित शिक्षकांना आजपर्यंत वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रमाणपत्र मिळालेले नाही. प्रमाणपत्र मिळण्यास विलंब का? असा प्रश्न विचारत, प्रमाणपत्रास विलंब शिक्षकांच्या सेवाविषयक प्रश्नांमध्ये होणारा हा विलंब अयोग्य आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रमाणपत्र तातडीने उपलब्ध करून द्यावे, सेवाविषयक प्रगतीस अडथळा ठरत असून त्यांच्या वेतन उन्नती प्रक्रियेत अनावश्यक अडथळे निर्माण होत असल्याचे हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर यांनी म्हटले आहे. प्रमाणपत्र तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी याबाबत आपल्या मागण्यांचे निवेदन संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर यांनी मा.राहुल जी रेखावार सर (संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे) तसेच मा.सचिंद्र प्रताप सिंह सर (शालेय शिक्षण आयुक्त, पुणे) यांना ईमेल आणि व्हॉट्सॲप द्वारे पाठविले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments