गृह राज्य मंत्री योगेश रामदास कदम यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम
जालना/राज्याचे गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन मंत्री हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.
राज्यमंत्री कदम हे शुक्रवार दि. 4 एप्रिल, 2025 रोजी सकाळी बीड येथून हेलिकॉप्टरने पोलीस ग्राऊंड जालनाकडे सकाळी 11.15 वाजता आगमन होणार आहे. तसेच पोलीस ग्राऊंड, जालना येथून नियोजन भवन, जिल्हाधिकारी जालना येथे प्रयाण करतील. तसेच सकाळी 11.30 ते 1.00 या कालावधीत नियोजन हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे मुख्य कार्यकारी अधिकारी जालना, सहा. आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन तसेच सहा आयुक्त (औषध) अन्न व औषध प्रशासन यांच्या आढावा बैठकीस उपस्थित राहतील. दूपारी 2.00 वाजता अर्जुन खोतकर यांचे कार्यालय, दर्शना बंगल्याच्या बाजूला भाग्यनगर, जुना जालना येथे शिवसेना जालना विधानसभा, बदनापुर विधानसभा, भोकरदन विधानसभा, परतूर विधानसभा पदाधिकाऱ्यांसमवेत बैठकीस उपस्थिती. दुपारी 3.30 वाजता भाग्यनगर जुना जालना येथून सावरगाव-राणीउंचेगाव मार्गे घनसावंगीकडे प्रयाण करतील. सायं. 4.30 ते 6.00 वाजता घनसावंगी येथे आगमन व आमदार हिकमत उढाण आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीस उपस्थित राहतील. तसेच सायं. 6.00 वाजता आमदार हिकमत उढाण यांचे कार्यालय येथून छत्रपती संभाजीनगर विमानतळ कडे प्रयाण करतील.
