Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादराष्ट्रवादी (अजित पवार )गटाच्या ओबीसी सेलच्या केज ता.अध्यक्षपदी गोवींद ससाणे यांची निवड

राष्ट्रवादी (अजित पवार )गटाच्या ओबीसी सेलच्या केज ता.अध्यक्षपदी गोवींद ससाणे यांची निवड

राष्ट्रवादी (अजित पवार )गटाच्या ओबीसी सेलच्या केज ता.अध्यक्षपदी गोवींद ससाणे यांची निवड
” सामाजिक सलोखा अबाधीत ठेवून विकासात्मक कामांना प्राधान्य देणार – गोविंद ससाणे.
ओबीसी सेल राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) केज ता. अध्यक्ष.
केज/प्रतिनिधी/ सोनी जवळा गावचे सरपंच गोविंद ससाणे यांची राष्ट्रवादी (अजित पवार ) गटाच्या ओबीसी सेलच्या केज तालुका अध्यक्ष पदी राज्याचे उप मुख्यमंत्री मा. ना. अजित पवार यांच्या आदेशाने जेष्ठ नेते रमेश आडसकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवा नेतृत्व ऋषीकेश आडसकर यांच्या नेतृत्वा खाली ओबीसी सेलचे बीड जिल्हाध्यक्ष विजय धायगुडे यांच्या अध्यक्षते खाली निवड करण्यात आली.
ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याच्या निमीत्ताने गावकर्यांकडून आयोजीत सत्कार समारंभात बोलताना श्री.मिनाज पटेल यांनी सांगितले कि या निवडीला जातीय चष्म्यातून न पाहता, अठरापगड जातींच्या समाजाला योग्य न्याय देण्याचे काम करून सर्वांच्या विकासाकडे लक्ष केंद्रीत करणार तसेच या निवडीमुळे सोनी जवळा गावची जिम्मेदारी वाढली असून सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे अंबाजोगाई साखर कारखान्याचे संचालक तथा ग्रामपंचायत सदस्य,मिनाज पटेल सर यांनी सांगितले.
यावेळी पुढे बोलताना ओबीसी सेलचे केज तालुकाध्यक्ष श्री गोविंद ससाणे यांनी आपले विचार मांडताना सांगितले कि, राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजित पवार साहेबांच्या, राष्ट्रवादी पक्षाच्या ध्येय धोरणा प्रमाणे पुढील वाटचाल आमचे जेष्ठ नेते रमेशराव आडसकर साहेबांच्या,ज्यांनी मला पद दिले त्यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेतृत्व ऋषीकेश आडसकर यांच्या नेतृत्वा खाली, तसेच ओबीसी सेलचे बीड जिल्हाध्यक्ष विजय भागवतराव धायगुडे यांच्या अध्यक्षतेखाली केली जाईल तसेच सध्या अतिवृष्ठी ने केज तालुक्याती शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले असून आमचे जेष्ठ नेते मा. रमेशराव आडसकर शेतकर्यांच्या बांधावर जावून प्रत्यक्ष नुकसानीची पहाणी करत आहेत नुकसानी चा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
झालेल्या निवडीला जातीच्या चेष्म्यातून न पाहता, जातीय तेड निर्माण न करता, सामाजिक सलोखा अबाधित राखून अठरापगड जातींच्या नागरीकांच्या समस्या, अडचणी सोडवण्याचे काम करणार आहे तसेच बेरोजगार युवकांसाठी जिल्हा उद्योग केंद्राकडून व्यावसाय मार्गदर्शन शिबीर आयोजीत करून युवकांना व्यावसायाचे मार्गदर्शन करणार, सर्वांचा विकास करून दोन समाजातील दरी मिटवण्यासाठी, शेतऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करत राहणार असे गोवींद बापू ससाणे,ओबीसी सेलचे (राष्ट्रवादी अजीत पवार ) गटाचे केज तालुकाध्यक्ष यांनी सांगितले सर्वांसाठी काम, सर्वांचा विकास करण्यासाठी काम करणार. यावेळी मान्यवरांची भाषणे झाली तसेच सत्कार समारंभ सोहळ्याचा समारोप झाला या प्रसंगी मिनाज पटेल सर, अंबाजोगाई साखर कारखान्याचे संचालक तथा ग्रामपंचायत सदस्य, वैजनाथ गायकवाड, जब्बार शेख, श्रीमंत गायकवाड, भागवत कोकाटे, सेवा सहकारी सोसायटी संचालक, अनिल ससाणे, सोमनाथ ससाणे, पांडुरंग ससाणे, श्रीराम ससाणे, हाजी महम्मद शेख, किरण ससाणे, पप्पू धेंडुळे, राहूल करपे, शिवाजी कोकाटे आदी ग्रामस्थ उपस्थित होते शेवटी गोविंद (बापू )ससाणे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments