Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादगौण खनिज तस्करांना सळो की पळो करूण सोडले

गौण खनिज तस्करांना सळो की पळो करूण सोडले

पैठण महसूल महीला पथकाची प्रशंसा पुर्व कामगीरी

गौण खनिज तस्करांना सळो की पळो करूण सोडले
आत्ताच एक्सप्रेस
 पैठण/ विशेष प्रतिनिधी/ पैठण तालुक्यातील शासकीय गाळ मिश्रित वाळु घाट चालू असूनही अनेक ठिकाणी वाळू चोरी व अवैध उत्खनन करून मुरुम,माती,तस्करी छुप्या पद्धतीने चालू असून काल विहमांडवा परिसरात कर्तबगार उपविभागीय अधिकारी महसूल पैठण-फुलंब्री निलम बाफना यांच्या आदेशाने तसेच पैठणचे तहसीलदार दिनेश झांपले यांच्या मार्गदर्शनाखाली विहामांडवा परिसरात गौण खनिज अवैध उत्खनन व वाहतूक विरोधी महिला पथकाने अवैध मुरुम वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई केली.महसुल पथकाने अचानक टाकलेल्या धाडीमुळे गौण खनिज तस्करामध्ये गोंधळ उडाला तर चालकाने आपली वाहने (हायला) पळवा-पळवी केली.परंतु सदर प्रसंगाला न घाबरता महीला महसूल पथकातील रणरागिणी व शासकिय वाहनचालक बी.डी. धारकर यांनी तात्पर्य दाखवत मोठ्या धाडसाने पळणारे हायवाचे पाठलाग करून पकडले. व पकडलेले वाहन पुढील कार्यवाहीसत्व सरळ तहसील कार्यालयात आणुन लावण्यात लावले आहे. सदरची कारवाई महिला महसूल चोरी विरोधी पथकाचे प्रमुख के.टी शेळके,मंडळ अधिकारी पैठण ग्राम महसूल अधिकारी जे.यू मुंढे, ग्राम महसूल अधिकारी शीतल झिरपे, महसूल सेवक अनिल घोडके, शासकीय वाहन चालक भारत धारकर यांनी केली आहे.
तर महसूल प्रशासनाकडून सराईत अवैध उत्खनन व करून गौण खनिज तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांचे मागील रेकॉर्ड ची माहिती लवकरच प्राप्त करण्यात येईल व अशा गुन्हेगारांविरूद्ध महसूल प्रशासन मोठी कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.विश्वासनिय सुत्रांकडून माहिती.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments