गोळेगाव मध्ये भीम जलसा कार्यक्रम थाटात
आष्टी/प्रतिनिधी/ येथून जवळच असलेल्या मौजे गोळेगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त आंबेडकरी भीम जलसा कार्यक्रम नुकताच थाटात संपन्न झाला.
याविषयी सविस्तर वृत्त असे की,दिनांक २४ एप्रिल रोजी सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी ठीक १०:०० वाजता ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली दुपारी ०४:३० वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आष्टी पोलीस ठाण्याचे प्रभारी गणेश सुरवसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मिरवणूकीची सुरुवात करण्यात येऊन गावातील मुख्य रस्त्याने मिरवणूक काढण्यात आली,मिरवणूक विसर्जना नंतर रात्री ०८:३० वाजता भिमाची वाघीण फेम प्रा.प्रिती भालेराव यांचा आंबेडकरी जलसा हा बहारदार भीमगीतांचा कार्यक्रम साजरा झाला,या कार्यक्रमात उपस्थितामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून आला यावेळी गावातील सर्वच समाजातील नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते सदरील कार्यक्रम ऐकण्यासाठी परिसरातील आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते,कार्यक्रमास आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस जमादार गायके,पो हे कॉ राणा पांढरे गावचे सरपंच उद्धव डोळस,पोलीस पाटील बबन डोळस,तसेच समता सैनिक दलाचे जवान देखील उपस्थित होते,कार्यक्रम यशस्वीतेसाठी जयंती कमिटीचे अध्यक्ष शरद डोळस,अजय प्रधान,विशाल प्रधान,राजेभाऊ प्रधान,राजेभाऊ डोळस,अमोल खरात,ऋतिक डोळस,सिद्धार्थ डोळस,महादेव डोळस,अंकुश प्रधान,प्रवीण डोळस,बंडू डोळस,मिलिंद प्रधान आदींनी परिश्रम घेतले.