महावितरणचा ”गो — ग्रीन” उपक्रम
तुका म्हणे, ” व्रक्षवली आम्हा सोयरे ” मानव आणि व्रक्षाचे अतूट ऋणानुबंध, स्नेहसंबंध आहेत. मानव नको असलेले कार्बनडाय आॅक्साईड श्वसनद्वारे सोडतो. हा सोडलेला कार्बनडाय आॅक्साईड श्वसन करून व्रक्ष मानवाला हवे असणारे ”प्राणवायू म्हणजेच आॅक्सिजन ”मुबलक प्रमाणात पुरवठा करतो. प्राणवायू शिवाय मनुष्य जगूच शकत नाही. म्हणून मानव व व्रक्षाचे अतुट नाते आहे. म्हणून व्रक्षाचे रक्षण झाले पाहिजे. व्रक्षतोड थांबली पाहिजे. व्रक्षाचे संरक्षण व संवर्धन करणे मानवाचे आघ कर्तव्य ठरते. व्रक्षाचे महत्व ओळखुन व्रक्ष संवर्धनाचा संदेश संत तुकाराम महाराजांनी 16 व्या शतकात प्रवचनातून लोकांसमोर मांडून जनजाग्रती केली आहे. कागद तयार करण्यासाठी बांबूची मोठया प्रमाणात होते. इमारतीसाठी व फर्निचर तयार करण्यासाठी मोठया प्रमाणात व्रक्षतोड करण्यात येते. महावितरण कंपनी दरमहा 3,07,93,967 ग्राहकांना देण्यात येणारे वीज बिल कागदाद्वारे पुरवठा करते. कागदाचा अपव्यय टाळण्यासाठी आधुनिकिकरण आणि ई तंत्रज्ञानाद्वारे ग्राहकांना ई — मेल पर्यायाचा उदय झाला आहे.
ग्राहकांना 10 रूपये सवलत
महावितरणकडून ‘गो-ग्रीन’ योजनेत छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’चा पर्याय निवडल्यास वीज ग्राहकांना प्रतिबिलात 10 रुपये सवलत सर्व ग्राहकांना दि. १ डिसेंबर २०१८ पासून देण्यात येत आहे. त्यामुळे वीजग्राहकांची वार्षिक 120 रुपयांची बचत होणार आहे. याशिवाय वीजबिल ‘ई-मेल’ तसेच ‘एसएमएस’द्वारे दरमहा मिळणार असल्याने ते लगेचच प्रॉम्ट पेमेंटसह ऑनलाईनद्वारे भरण्याची सोय उपलब्ध होत आहे. तसेच वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवण्याची सोय आहे. यासोबतच महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर वीजबिल मूळ स्वरुपात उपलब्ध असून ते डाऊनलोड किंवा प्रिंट करण्याची सोय आहे.वीज ग्राहकांनी गो ग्रीनच्या सवलतीचा लाभ घेतला तर छापील बिले कमी होऊन कागदाचा वापर कमी होईल व पेपरलेस कामाला चालना मिळेल तसेच पर्यावरणाचे रक्षण होईल.
अशी करावी नोंदणी —
गो—ग्रीन सेवेचा लाभ घेण्यासाठी https://www.mahadiscom.in
या संकेतस्थळावर जावे. यानंतर consumer Portal>Quick Access>Go-green for registering Go-green facillity सुविधा उपलब्ध आहेत. (https://billing.mahadiscom.in/gogreen.php) संकेतस्थळचा लाभ घ्यावा . कन्झुमर पोर्टलवर जावून क्युक अॅसेस वर जावून गो—ग्रीन मध्ये रजिस्ट्रि करतांना ग्राहक क्रमांक व बिलींग युनिटची माहिती टाकावी. त्यानंतर आपल्या चालू महिन्यातील वीज बिलावरील डाव्या बाजूला असलेल्या — सीजीएन गो—ग्रीन नंबर नोंद केल्यानंतर महावितरण कडून नोंदणी असलेल्या ईमेलवर पुष्टी करण्यासाठी लिंक पाठविली जाईल. ग्राहकाने पुष्टी केल्यानंतर गो—ग्रीनची नोंदणी पूर्ण होईल. त्यानंतर पुढील महिन्याला वीज देयकाची कागदी प्रत मिळणे बंद होईल व 10 रूपयांची सुट मिळण्यास सुरूवात होईल. तसेच मोबाईल क्रमांकाची नोंदणी असल्यामुळे सोबतच मोबाईलवर सुध्दा एसएमएसद्वारे देयकाची माहिती मिळेल. गो—ग्रीन सेवा ग्राहक कधीही बंद करू शकतात. सेवा बंद केल्यानंतर ग्राहकांना पूर्वीप्रमाणे कागदी देयक पाठविण्यात येते.
महावितरणच्या 3 कोटी लघुदाब ग्राहकांपैकी अद्यापपर्यंत 6 लाख 16 हजार ग्राहकांनी गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडला आहे. ज्या ग्राहकांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. त्यांना महावितरणच्या वेबसाईटवर जाऊन ग्राहक क्रमांक आणि बिलिंग युनिट ही माहिती भरून नोंदणी करता येते. महावितरणच्या मोबाईल ॲपवरूनही नोंदणी करता येते. नोंदणी करणाऱ्या ग्राहकाला ओटीपी क्रमांक पाठविण्यात येतो. त्यामुळे नेमक्या संबंधित ग्राहकाकडूनच नोंदणी होत असल्याची खात्री होते. त्यानंतर ग्राहकाला त्याने दिलेल्या ईमेल आयडीवर एक लिंक पाठविली जाते. लिंकवर क्लिक करून पडताळणी केली की प्रक्रिया पूर्ण होते. पुढच्या बिलापासून ग्राहकाला त्याची बिले ईमेलने पाठविली जातात व कागदी छापील बिले बंद केली जातात. ग्राहकाला हवे तेव्हा त्याला ईमेलने आलेल्या बिलाचा प्रिंट घेता येतो. त्यासोबत सर्वच ग्राहकांना त्यांच्या बिलाविषयी नियमीत माहिती देणारे एसएमएसही पाठविले जात आहेत.वीजग्राहकांनी महावितरणच्या गो-ग्रीन योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व पर्यावरणपुरक योजनेमध्ये योगदान द्यावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
सुनील जाधव
