ॲनिमिया मुक्त गाव हा उपक्रम राबविण्यात आला
फुलंब्री/प्रतिनिधी/ स्त्रिया तसेच किशोरवयीन मुलींमध्ये वाढते ॲनिमिया चे प्रमाण व त्यामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर स्वरूपाच्या समस्या यावर लक्ष केंद्रित करून त्यावर उपाययोजना करणे करिता यशदा महाराष्ट्र जिल्हा परिषद औरंगाबाद पंचायत समिती तसेच सहाय्यक ट्रस्टच्या वतीने महिला स्नेही व बालिका स्नेही संकल्पने अंतर्गत कुंभेफळ तालुका जिल्हा औरंगाबाद गावात ॲनिमिया मुक्त गाव हा उपक्रम राबविण्यात येणार आहे . त्यासाठी नुकतीच 26/7/ 2025 नियोजन बैठक कुंभेफळ येथे घेण्यात आली
सदर नियोजन बैठकीस यशदा मार्फत सहाय्यक ट्रस्ट चे प्रशिक्षक तसेच कार्यक्रम समन्वयक प्रमोद शिंदे उपस्थित होते उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना प्रमोद शिंदे यांनी ॲनिमिया हा आजार नसून शारीरिक स्थिती असल्याचे स्पष्ट केले तसेच ॲनिमिया वर मात करण्यासाठी माहिती व उपाययोजना या विषयावर माहिती दिली
ॲनिमिया मुक्त गाव करताना वार्षिक नियोजन यात हिमोग्लोबिन तपासणी, आरोग्य, पोषण आणि सेंद्रिय पोषण परसबाग निर्मिती वर प्रशिक्षण भिंती रंगविणे गावात होणाऱ्या स्पर्धा त्यासाठी येणाऱ्या खर्च चा आराखडा तसेच यात शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, उमेद, ची भूमिका नेतृत्व म्हणून सरपंच, उपसरपंच ग्रा.प. सदस्य , यांची भूमिका याशिवाय शासन स्तरावरून ग्रामपंचायत अधिकारी तसेच पंचायत समिती वरून विस्तार अधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांचे सहकार्य यावर मांडणी केली. यावेळेस ॲनिमिया फ्री इंडिया फोरमचे प्रसिद्ध स्थानीक संस्था महामाया आधार सेवाभावी संस्था संभाजीनगर, राजकुमार कांबळे. यांनी वर्षभरात त्यांच्याकडून राबविण्यात येणारे नियोजन सांगितले बैठकीच्या शेवटी सरपंच सौ. कांताबाई सुधीर भाऊ मुळे यांनी जिल्ह्यातून फक्त आमचे एकच गाव या कार्यक्रमासाठी निवडले असल्याने अभिमान व्यक्त करत आता जबाबदारी वाढल्याचे नमूद केले .तसेच वरील सर्व उपक्रम राबवून आमचे गाव नक्कीच ॲनिमिया मुक्त करू असे जाहीर केले. या बैठकीचे नियोजन ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती. एस. पी. तायडे. यांनी केले. या बैठकीस सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. शिवाजी साळुंखे साहेब, उमेद प्रभाग समन्वयक मनीषा जाधव, उपसरपंच संतोष शेजवळ, ग्रामपंचायत सदस्य महेश भोसले प्रवीण गोजे, आम्रपाली साबळे, मंगलबाई शेजवळ, गयाबाई शेजुळ,मनीषा शेळके ,नैना मुळे, गजानन भावले, सुधीर मुळे, सुनील मुळे मुख्याध्यापक शिरसाट सर, उपकेंद्र सीएचओ अश्विनी नागरे, मॅडम, ए. एन. एम श्रीमती.काळे. एम. पी. डब्ल्यू . कराळे,बचत गटांचे सीआरपी, ग्राम संघ अध्यक्ष, सचिव, सर्व अंगणवाडी कार्यकर्त्या सर्व आशा वर्कर सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते .