गोड तेलाचे भाव वाढले, सर्वसामान्य नागरिकांचे ख़बरें मोडले
फुलंब्री /प्रतिनिधी/ पेट्रोल डिजल गैस सिलेंडर व गोड तेलाचे भाव वाढले असल्याने
सर्वसामान्यांचा खिसा आणखी कापला जात आहे. महागाईचा आगडोंब उसळण्यास सुरुवात झाली आहे. तेल कंपन्यांकडून खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. तसेच एक दोन दिवसांत पुन्हा वाढ होईल, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. करडीची आवक कमी असल्यामुळे तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. शेंगदाणा तेलाचे दर स्थिर आहेत. सोयाबीन, सुर्यफुलाची आवक कमी असल्याने तेल दरावर त्याचाही परिणाम झालेला आहे.
खाद्य तेलाचे दर वाढण्याची मुख्य कारण म्हणजे मागणी आणि पुरवठा यात असंतुलन निर्माण होणे असे आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी वाढणे, पुरवठ्यात अडथळे येणे आणि हवामाना बदल यामुळेही खाद्य तेलाचे दर वाढू शकतात.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी, चीन, भारतासह इतर देशांमध्ये खाद्य तेलाची मागणी वाढत आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर किमती वाढतात.