गिग, प्लॅटफॉर्म कामगारांनी इ-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर/ गिग वर्कर, प्लॅटफॉर्म वर्कर व ॲग्रिगेटर यांनी इ-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.
केंद्र शासनाने यासंदर्भात नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. अशी नोंदणी केल्यास या कामगारांची माहिती केंद्र सरकारकडे तयार होईल. त्यासाठी सर्व गिग व प्लॅटफॉर्म कामगारांनी आपली नोंदणी करावी. तसेच डिजीटल मध्यस्थी म्हणुन काम करणाऱ्या सर्व सेवा पुरवठादार यांनी ॲग्रिगेटर म्हणून नोंदणी करावी. नोंदणीसाठी register.eshram.gov.in/#/user/platform-worker-registration या लिंकवर जावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व कामगार उपायुक्त सी.ए. राऊत यांनी केले आहे.
गिग व प्लॅटफॉर्म कामगार व ॲग्रिगेटर म्हणजे काय?
गिग व प्लॅटफॉर्म वर्कर म्हणजे शेअरिंग वाहन कामगार, अन्न व किराणा पुरवठा कामगार, लॉजिस्टीक सेवा देणारे कामगार, मिडीया सर्व्हिसेस इ.सर्व प्लॅटफॉर्म , गिगा वर्कर या व्याख्येत येतात. आणि ॲग्रिगेटर म्हणजे ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा, स्नॅप्डील, अजिओ, मिशो, स्विगी, झोमॅटो असे वेगवेगळे सेवा पुरवठादार वा डिजीटल मध्यस्थ हे होय. अशा वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करणारे कामगार हे इ-श्रम या पोर्टलवर eshram.gov.in नोंदणी करु शकतात.


