Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादघनसावंगी विधानसभेतून गोविंद ढेंबरे यांना विधान 

घनसावंगी विधानसभेतून गोविंद ढेंबरे यांना विधान 

घनसावंगी विधानसभेतून गोविंद ढेंबरे यांना विधान

परिषदेसाठी संधी द्यावी – भाजप कार्यकर्त्यांचा एकमुखी ठराव

पक्ष संघटन मजबूत करणाऱ्या कार्याचा गौरव • स्थानिक नेतृत्वाला न्याय देण्याची मागणी
केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या सूचननुसार भारतीय जनता पक्षाच्या घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी एकत्र येत गोविंद नामदेव ढेंबरे यांना महाराष्ट्र विधान परिषदेसाठी आमदार म्हणून संधी द्यावी, अशी जोरदार मागणी केली आहे. यासंदर्भात आयोजित बैठकीत सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला.
या बैठकीत ढेंबरे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण आणि निष्ठावंत कार्याचा विशेष उल्लेख करण्यात आला. ग्रामीण भागातील प्रश्न सोडविणे, कार्यकर्त्यांना बळ देणे आणि पक्षाची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे यामध्ये त्यांचे मोठे योगदान असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
कार्यकर्त्यांनी असेही नमूद केले की, घनसावंगी विधानसभा मतदारसंघात पक्ष अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी स्थानिक व समर्पित नेतृत्वाला संधी देणे अत्यंत आवश्यक आहे. ढेंबरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
या ठरावाला सर्व कार्यकर्त्यांनी एकमताने पाठिंबा दर्शविला असून, लवकरच हा ठराव पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठविण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवर निर्माण झालेली ही एकजूट आणि पाठिंबा लक्षात घेता, ढेंबरे यांच्या उमेदवारीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments