गोरठा गटातील शेतकऱ्याच्या जमिनी ओलिताखाली आणू-भाजपचे नेते मारोतराव कवळे
उमरी/दुर्गा नगर, फुलसिंगनगर, वसंतनगर, ईश्वर नगर, सितानगर, नानूनाईक तांडासह इतर गावातील शेतकऱ्यांच्या शेतीला बारमाही पाणी मिळाले नसल्याने या भागातील सर्व शेतकरी आर्थिक संकटात आहेत. त्यासाठी शेतकरी म्हणून तुम्ही एकत्र या, शेतीला बारमाही पाणी कसे मिळेल उपाय करू. त्यातून तुमची आर्थिक बाजू सुधारल्याशिवाय राहणार नाही, असे शेतकरी नेते तथा भारतीय जनता पक्षाचे नेते मारोतराव कवळे गुरुजी यांनी सांगितले. उमरी तालुक्यातील काही भागात उर्ध्व पैनगंगा प्रकल्प
अंतर्गत सिंचनाची सोय झाली. तर काही तांड्यासह जिरोणा, बितनाळ, मोखंडी, सावरगाव कला, बोथी, तुराटी, हुंडा, रामखडक भागात अजून सिंचनाची सोय झाली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडून आत्महत्या करत आहेत. त्यासाठी उपाययोजना करून ज्या गावाच्या आसपास तळे आहेत, त्यासाठी तळयात पाणी सोडून समिती नेमून सिंचनाची सोय होईलच. गावातील पाणी टंचाईचा प्रश्न कायम सुटले. त्यासाठी कोणतेही राजकारण न करता तुम्ही एकत्र या. आपण सर्वांनी मिळून उपाय करू, असेही कवळे गुरुजी म्हणाले.