झरी येथे संकरीत गाईच्या पोटातून काढला हिरव्या घासाचा गोळा
लताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद-तालुक्यातील झरी येथे पशुसंवर्धन विभाग खुलताबाद यांच्या वैद्यकीय चमुे संकरीत गाईवर सोमवारी (दि.२१) यशस्वी शस्त्रक्रिया करून गाईच्या पोटातून हिरव्या घासाचा गोळा काढला. या बाबत अधिक माहिती अशी,तालुक्यातील झरीचे सरपंच करण राजपूत यांच्या गाईला मागील चार दिवसा पासून पोट फुगण्याचा आजार दिसत होता त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी यांना संपर्क केला असता त्यांनी सोमवारी (दि.२१) रोजी गाईवर शस्त्रक्रिया केली,यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ.प्रदीप मोराळे,डॉ. अर्जुन दोडके, डॉ.जाकिर शहा,खाजगी सेवादाता तुषार काळे यांनी शस्त्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवला व यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करून गाईचे निदान केले.
