अभ्यासासह सत्यत हिच घवघवीत यशाची खरी पाहिरी.गटशिक्षणाधिकारी दिवेकर
कन्नड/ कन्नड नगरीतील शैक्षणिक दृष्टीकोनातून अग्रगण्य असणाऱ्या श्री.संत ज्ञानेश्वर विद्यामंदिरात इयत्ता 10 वी कक्षेत घवघवीत यश संपादित केलेल्या विद्यार्थी व त्यांचे पालकांचा विद्या मंदिरात गौरव कर्ते वेळेस कन्नडचे गटशिक्षणाधिकारी मनीष दिवेकर म्हणाले की,अभ्यासासह ज्यांनी त्यात सत्यात् ठेवले तेच असे घवघवीत यशाचे मानकरी ठरतात.
या पार पडलेल्या भव्य दिव्य गौरव कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी संस्थेचे अध्यक्ष साबुसिंग राठोड यांनी भूषविले,या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी मनीष दिवेकर,विशेष अतिथी म्हणून शिक्षणविस्तार अधिकारी तथा केंद प्रमुख बाजीराव ताठे,केंद्रीय मुख्याध्यापक दिलीप गायकवाड उपस्थित होते.
या विद्यालयातील वेदांत दिलीप केवट या विद्यार्थाने 98.60% गुण संपादित करून तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकवीला आहे.त्याचा व त्याच्या पालकाचा विशेष सत्कार व गौरव शाळेने व उपस्थित मान्यवरांनी केला.त्याच बरोबर विद्यामंदिरातील इतर गुणवंतात कु.साक्षी पवार 94%, अनुष्का पवार93.80%पूर्वी राठोड 93.20%वेदांत हर्दे 93.00 यांचेसह इतर 20 विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरान कडुन प्रमाणपत्र व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे.या वेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष साबुसिंग राठोड,गटशिक्षणाधिकारी मनीष दिवेकर,उपाध्यक्ष रामदास सुरडकर,शिक्षणवीस्तार अधिकारी बाजीराव ताठे,सचिव पांडुरंग राठोड,सहसचिव संजय पुरी,कोषाध्यक्ष सरलाताई सोनावणे,संचालक मुकुंद शिंदे,शिवाजी वाघ, केंद्रीय मुख्याध्यापक दिलीप गायकवाड,विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश जिरेमाळी,हा कार्यक्रम यशस्वी करणेसाठी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने कठोर परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.