Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादघरोघरी राबवा ‘हर घर तिरंगा अभियान’- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

घरोघरी राबवा ‘हर घर तिरंगा अभियान’- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

घरोघरी राबवा ‘हर घर तिरंगा अभियान’- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर – देशभक्तीचे उत्साहपूर्ण वातावरण असून त्यात घरोघरी हर घर तिरंगा हे अभियान राबवा,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.

            यासंदर्भात आज जिल्ह्यातील सर्व तालुका कार्यालये, आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसिलदार यांच्याशी जिल्हाधिकारी स्वामी यांनी दुरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. उपजिल्हाधिकारी सामान्य शाखा श्रीमती संगिता राठोड. एकनाथ बंगाळे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ आदी मुख्यालयातून सहभागी झाले होते.

श्रीमती राठोड यांनी अभियान राबविण्याची कार्यपद्धती सांगितली. आपापल्या गाव, शहरात या अभियानात लोकांना सहभागी करुन घ्यावे,असे आवाहन त्यांनी केले.जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, अभियानाची छायाचित्रे केंद्रशासनाच्या वेबसाईटवर अपलोड करावी,असेही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments