Tuesday, October 28, 2025
Homeऔरंगाबादपत्रकारांसाठी घरकुल योजनेच्या प्रस्तावासह विविध विषयावर पत्रकारांची बैठक; पत्रकारांना  लवकरच  मिळणार विमा...

पत्रकारांसाठी घरकुल योजनेच्या प्रस्तावासह विविध विषयावर पत्रकारांची बैठक; पत्रकारांना  लवकरच  मिळणार विमा सुरक्षा 

पत्रकारांसाठी घरकुल योजनेच्या प्रस्तावासह विविध विषयावर पत्रकारांची बैठक; पत्रकारांना  लवकरच  मिळणार विमा सुरक्षा 

जालना/ जिल्ह्यातील विविध वर्तमानपत्रे आणि टीव्ही चॅनल्सवर काम करणारे पत्रकार तसेच फिल्ड वर्क करणारे संपादक यांच्या गरजे प्रमाणे घरकुलाचे प्रस्ताव आणि त्यांना दिली जाणारी विमा सुरक्षा यासह विविध विषयावर सोमवार दि. 4 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 4 वाजता पत्रकारांची बैठक घेण्यात आली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अच्युत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. या बैठकीला दिपक शेळके, दिलीप पोहनेरकर, सुशील वाठोरे, संदीप भाकरे, कादरी हुसेन, अतुल पडूळ, संतोष भुतेकर, विनोद काळे, दशरथ वाकोडे, दिनेश नंद यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान पत्रकार घरकुल योजना, पत्रकार विमा सुरक्षा, पत्रकार व कुटुंबीयांची आरोग्य तपासणी, पत्रकारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती व शैक्षणिक सवलत योजना राबविने व त्यासाठी पत्रकारांची निवड करणे, पत्रकारांची योजनेसाठी पात्रता आदी विषयावर चर्चा करण्यात आली. पत्रकारांबरोबर पत्रकारितेच्या कामात महत्वाची भुमीका बजावणारे ऑपरेटर्स, वृत्तपत्र वितरक यांनाही या योजनेचा लाभ देण्यात देणार आहे. त्यामुळे लवकरच एक फॉर्म उपलब्ध होणार असून सर्वांनी तो फॉर्म भरुन सादर करावा असे आवाहन अच्युत मोरे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments