Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादघनसावंगी तहसील कार्यालयावर शिवसेना उबाठाच्या वतीने हंबरडा मोर्चा

घनसावंगी तहसील कार्यालयावर शिवसेना उबाठाच्या वतीने हंबरडा मोर्चा

घनसावंगी तहसील कार्यालयावर शिवसेना उबाठाच्या वतीने हंबरडा मोर्चा
शेतकऱ्यांना कर्जमाफीसह तात्काळ आर्थिक मदत देण्याची केली मागणी
घनसावंगी/ घनसावंगी तालुक्यामध्ये अतिवृष्टी व ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. यामध्ये पिकांचे, जमीनीचे, विहिरीचे, घरांची पडझड तसेच जनावरांचे देखील नुकसानीसह अन्य प्रकारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी,तात्काळ आर्थिक मदत देण्याच्या मागणीससह इतर मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर शिवसेना उबाठाच्या वतीने हंबरडा मोर्चा काढण्यात येऊन निदर्शने करण्यात आले. आणि निवेदन तहसीलदार पूजा वंजारी यांना देण्यात आले.
घनसावंगी तालुका शिवसेना उबाठाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना हेक्टर ५० हजार रुपयांची आर्थिक मदत त्वरीत जाहिर करावी,नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना कर्जातुन कर्जमुक्त करावे,पिक विम्याचे कठीण निकष तातडीने शिथील करुन पंचनाम्याची प्रक्रिया बाजुला ठेवत विम्याची रक्कम त्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अतिवृष्टीमुळे घरे व पशुधनाचे नुकसान झालेल्या नागरीकांना जुने निकष न लावता योग्य आणि पुरेसा मोबदला त्वरीत देण्यात यावा, फळबागायतदार शेतकऱ्यांची फळ गळ झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत त्वरीत खात्यात जमा करावी, फार्मर आयडीची सक्ती न करता ७/१२ धारक सर्व शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनावर युवासेना जिल्हाध्यक्ष गणेश कनके,उबाठा तालुकाप्रमुख संदीप कंटूले,गटनेते यादव देशमुख,बबनराव घोगरे, ज्ञानेश्वर आर्दड,बळीराम देशमुख, ऋषिकेश म्हस्के,अनिकेत ढवळापुरे,राजू वखरे,भगवान काळे,संतोष जाधव,वैभव खरात,अबन देशमुख,संतोष कथले,महेश पाचागरे,सोहेल शेख,गणेश देशमुख यांच्यासह इतरांच्या स्वाक्षरी आहेत.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments