जालना शहरातील घाण कचरा व तुडुंब भरलेल्या नाल्यांची सफाई करून धूर फवारणी करण्याची ओबीसी विभागाचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष शिवप्रकाश चितळकर यांची पालिकेकडे मागणी
जालना/प्रतिनीधी/ दिनांक 23 सोमवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार सध्या पावसाळ्याचे दिवस असून जालना शहरातील गटारी तुडुंब भरलेल्या असल्याचे दिसून येत आहेत. यामुळे नाल्यांचे घाण पाणी रस्त्यावर येत आहे. काही प्रभागांमध्ये तर अक्षरशः नागरिकांच्या घरांमध्ये हे घाण पाणी घुसत आहे. त्यामुळे डेंगू, मलेरिया,टायफाईड,हिवताप यासारखे आजार बळवण्याची शक्यता नाकारता येणार नाही.सध्या जालन्यातील शासकीय व खाजगी रुग्णालयामध्ये रुग्णांची संख्या खूप वाढलेली आहे. साथीच्या आजारावर ऊपाययोजना म्हणून महानगरपालिकेने शहरातील प्रत्येक प्रभागांधील घाण कचरा वेळोवेळी उचलावा, मच्छरांची ऊत्पती होऊ नये म्हणून धुर फवारणी करावी तसेच तुडुंब भरलेल्या नाल्यांची साफसफाई करावी अशी मागणी काँग्रेस ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष शिवप्रकाश चितळकर यांच्या वतीने जालना शहर महानगर पालिके कडे करण्यात आली आहे.