्लॉरेन्स नाईटिंगेल नर्सिंग कॉलेजचे घवघवीत यश
जालना :- शहरातील फ्लॉरेन्स नाईटिंगेल जी.एन.एम. नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जी.एन.एम. प्रथम वर्षाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. फ्लॉरेन्स नाईटिंगेल नर्सिंग कॉलेजची ही पहिलीच बॅच असून, प्रथम वर्षाच्या परीक्षेत रीना अनिल ढाकणे या विद्यार्थिनीने ७४.४० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर शुभांगी राजकुमार नखाते हिने ६८.८० टक्के घेत द्वितीय क्रमांक आणि विशाल अशोक गवारे याने ६५.४० टक्के मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे शिव शंकर विठ्ठल पुरी (६५.२० टक्के) आणि आकाश अशोक भालेराव (६१.८० टक्के) हे विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. यावेळी महािवद्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गजानन वाळके पाटील व संस्थेचे सचिव अनिकेत वाळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचे माजी मंत्री आ. अर्जुनराव खोतकर, शिवसेना संपर्कप्रमुख भास्करराव आंबेकर, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक भास्करराव दानवे, शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, जीवन सले, अजित मानधनी यांनी अभिनंदन केले आहे.
