Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादगेल्या दीड ते दोन महिन्यांपासून वारंवार होत असलेल्या वीज पुरवठा खंडित

गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून वारंवार होत असलेल्या वीज पुरवठा खंडित

गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून वारंवार होत असलेल्या वीज पुरवठा खंडित

पैठण प्रतिनिधी बबन उदावंत
सतत वीज खंडितीमुळे त्रस्त नागरिकांचे एमएसईबी कार्यालयात निवेदन
पैठण शहरात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून वारंवार होत असलेल्या वीज खंडितीमुळे नागरिक त्रस्त झाले असून अखेर संतप्त नागरिकांनी एमएसईबी कार्यालयात जाऊन निवेदन दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील इंदिरानगर व यशवंतनगर परिसरात दररोज सकाळी सुमारे ५ ते १० वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित होत आहे. याबाबत नागरिकांनी वारंवार पाठपुरावा करून तसेच तोंडी सूचना देऊनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नव्हती. त्यामुळे नागरिकांनी कंटाळून थेट एमएसईबी कार्यालय गाठत अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
यावेळी एमएसईबीचे अधिकारी वंगाळ उपस्थित होते. नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यांनी येत्या दोन दिवसांत इंदिरानगर व यशवंतनगर परिसरासाठी नवीन डीपी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
नागरिकांनीही लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी यावेळी केली. याप्रसंगी सुनील काकडे विष्णु सोनारे बबन उदावंत महेश औरंगे अमोल लंगोटे बळीराम सोनटक्के सागर काकडे अभिषेक जायगुडे आदी सह उपस्तित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments